टक्का वाढविण्यात प्रशासनाला अपयश 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

नागपूर - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का 60 ते 65 टक्केपर्यंत वाढविण्यासाठी आवश्‍यक प्रयत्न करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाकडून करण्यात आल्या होत्या. महानगरपालिका निवडणुकीत मात्र तुलनेत कमी टक्के मतदान झाले. त्यामुळे टक्केवारी वाढविण्यात प्रशासनाला अपयश असून, मतदान जनजागृतीवर करण्यात आलेला कोट्यवधींचा खर्चही वाया गेल्याचे दिसते. 

मागील निवडणुकीत जवळपास 52 टक्केच मतदान झाले. यंदा 53.72 टक्के मतदान झाले. कोट्यवधी खर्च करून फक्त पावणेदोन टक्केच मतदानात भर पडली. मतदान जनजागृतीबाबत आयोगाकडून कोट्यवधींचा खर्च करण्यात आला. बडे स्टार ब्रॅंड ऍम्बेसिडर करण्यात आले. जनजागृतीसाठी रथ तयार करण्यात आला. पथनाट्यही करण्याच्या सूचना आयोगाकडून देण्यात आल्या. मात्र, महानगरपालिकेकडून याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. आयोगाने मतदार याद्या योग्यरीत्या करण्यात करून प्रत्येक मतदाराच्या घरी वोटर स्लिप पोहोचविण्याचे आदेश दिले होते. तसेच मतदान केंद्रावरही वोटर स्लिप देण्याची व्यवस्था करण्याचे आदेश दिले. मात्र, ही व्यवस्थाही करण्यात आली नाही. त्यामुळे अनेकांना नाव आणि मतदार केंद्रच मिळाले नाही. याचा परिणाम मतदानावर झाला. 

महापालिकेत 20 लाख 93 हजार 392 मतदारांची नोंद आहे. यापैकी 11 लाख 24 हजार 631 मतदारांनीच मतदान करण्यासाठी पुढे आले. 9 लाख 68 हजार 761 मतदारांना मतदान करता आले नाही. विशेष म्हणजे मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा जवळपास 90 हजारांच्या मतदारांची भर पडली. यातील बहुतांश मतदार तरुण आहे. ते मतदानासाठी उत्सुक होते. त्यामुळे मतदानाचा टक्के वाढणे अपेक्षित होते. मात्र, प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका मतदानाच्या टक्केवारीवर झाल्याचे दिसते. 

Web Title: Percent increase government failure