लॉकडाऊनच्या काळात वाढल्या तक्रारी, मग मद्यविक्री दुकानदारांना बसला हा फटका

बुधवार, 27 मे 2020

लॉकडाऊनदरम्यान तक्रारी आलेल्या दुकानांची तपासणी केली असता मद्यसाठ्यामध्ये तफावत, बनावट दारूची निर्मिती आदी कारणांवरून जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी दोन बार ऍन्ड रेस्टॉरंटचे परवाने कायमस्वरूपी रद्द केले

यवतमाळ : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून मद्यविक्री करणाऱ्या 17 दुकानांचे परवाने आतापर्यंत जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी कायमस्वरूपी रद्द केले आहेत. यात आठ बार ऍन्ड रेस्टॉरंट, पाच देशी दारूची दुकाने, दोन वाईन शॉप, एक बिअर शॉपी आणि विदेशी दारूचे होलसेल असलेल्या एका गोदामाचा समावेश आहे.

तलवारीने केक कापून साजरा केला वाढदिवस, मग...

लॉकडाऊनदरम्यान तक्रारी आलेल्या दुकानांची तपासणी केली असता मद्यसाठ्यामध्ये तफावत, बनावट दारूची निर्मिती आदी कारणांवरून जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी दोन बार ऍन्ड रेस्टॉरंटचे परवाने कायमस्वरूपी रद्द केले. यात आर्णी तालुक्‍यातील जवळा येथील हॉटेल अमित रेस्टॉरंट ऍन्ड बार आणि यवतमाळ येथील हॉटेल सिम रेस्टॉरंट ऍन्ड बारचा समावेश आहे.

तसेच मद्यसाठ्यात तफावत आढळून आल्याने मद्यविक्री करणाऱ्या यवतमाळ येथील इन्फिनिटी स्पोर्टस क्‍लब, दारव्हा रोडवरील हॉटेल नंदिनी रेस्टॉरंट ऍन्ड बार, हॉटेल झेलेलाल प्राईड, हॉटेल चेतना वाईन बार, हॉटेल एस. कुमार वाईन बार आणि हॉटेल एकवीरा वाईन बार या दुकानांना प्रत्येकी 50 हजार रुपयांप्रमाणे तीन लाख रुपये दंड तर लोहारा येथील ओम बिअर शॉपी या दुकानाला 25 हजार रुपये दंड असा सव्वातीन लाख रुपयांचा दंड ठोठावला.