वाडी (जि. नागपूर) : आयुधनिर्माणी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला वाडी पोलिसांनी परवानगी नाकारली. यामुळे अंबाझरी डिफेन्स कारखान्यातील कर्मचाऱ्यांत रोष निर्माण झाला आहे. आयुधनिर्माणीच्या खासगीकरणाविरोधात कर्मचारी निषेध नोंदविणार होते.
केंद्र सरकारच्या देशातील 41 आयुधनिर्माणी कारखान्यांचे खासगीकरण करण्याच्या प्रस्तावित योजनेचा तीव्र विरोध आंदोलन देशभरात आयुधनिर्माणी मागील 15 दिवसांपासून सुरू आहे. याच आंदोलनांतर्गत शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता डिफेन्स प्रवेशद्वारासमोर केंद्र शासनाचे धनाकर्ष व निषेध करीत 300 पेक्षा अधिक आंदोलनकर्ते कामगार सामूहिक मुंडण करणार होते. यासाठी रेड युनियन, बीएमएस, इंटक, डिटूच्या संयुक्त संघर्ष समितीने पोलिस विभागाला परवानगी मागितली, मात्र ती नाकारण्यात आली.
हे आंदोलन लोकशाही पद्धतीने होणार असल्याने त्यास परवानगी मिळणे अपेक्षित होते. याशिवाय आंदोलनामुळे अडथळा निर्माण होणार नव्हता. तरीदेखील परवानगी नाकारल्याने आयुध निर्माणी कर्मचाऱ्यांत रोष निर्माण झाला. आंदोलकांना घाईगडबडीने कार्यालयात चर्चेसाठी बोलविले. शनिवारी राष्ट्रपती, राज्यपाल या अतिविशिष्ट व्यक्तींचा कार्यक्रम असल्याने आंदोलन स्थगित करण्याचे कारण देण्यात आले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.