खोटा गुन्हा रद्द करण्यासाठी याचिका

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

नागपूर : वाडी पोलिस ठाण्याचे तत्कालीन द्वितीय पोलिस निरीक्षक प्रशांत जाधव यांच्याविरुद्ध एका तरुणीने बलात्काराची तक्रार दिल्यानंतर त्याचदिवशी जाधव यांनी सीताबर्डी पोलिस ठाण्यात तरुणीविरुद्ध खोटा गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा रद्द करण्याकरिता तरुणीने नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. न्या. झेड ए हक आणि न्या. पुष्पा गणेडीवाला यांनी सीताबर्डी पोलिस व जाधव यांची पत्नी यांना नोटीस बजावून येत्या 4 नोव्हेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिलेत.

या प्रकरणाची थोडक्‍यात हकिकत अशी की, तक्रारकर्ती तरुणीची मैत्रीण बेपत्ता असल्यामुळे ती विचारपूस करण्याकरिता वाडी पोलिस ठाण्यात गेली होती. यादरम्यान वाडी ठाण्याचे तत्कालीन द्वितीय पोलिस उपनिरीक्षक जाधव यांच्याशी तिची ओळख झाली. नंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. यादरम्यान तरुणीने त्यांच्यावर अत्याचार केल्याचा आरोप केला. तरुणीने जाधव यांच्याविरुद्ध वाडी पोलिस ठाण्यात 27 फेब्रुवारी 2019 रोजी अत्याचार व ऍट्रॉसिटी कलमांतर्गत तक्रार दिली. तरुणीने तक्रार दिल्यानंतर त्याच दिवशी जाधव यांनी आपल्या पत्नीला फिर्यादी करून सीताबर्डी पोलिस ठाण्यात तरुणी व तिच्या मैत्रिणीविरुद्ध तक्रार दाखल दिली. याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी कलम 341, 294, 506 (ब) 34 अंतर्गत तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल केला. दरम्यान हा गुन्हा रद्द करण्याकरिता तिने हायकोर्टात याचिका दाखल केली. तरुणीचे वकील ऍड. वासुदेव कापसे यांनी हायकोर्टाच्या निदर्शनास आणून दिले की, हा गुन्हा खोटा आहे. तरुणीवर दबाव टाकण्याकरिता जाधव यांनी तिच्याविरूध्द खोटी तक्रार आपल्या पत्नीमार्फत पोलिस ठाण्यात दिली. यापूर्वी तरुणीने जाधव यांच्याविरुद्ध वाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. तरुणीच्या तक्रारीच्या चार तासांनंतर व घटनेच्या आठ तासांनंतर जाधव यांनी सीताबर्डीत तक्रार दिली. ही घटना खरेच घडली असती तर आठ तासांचा वेळ गुन्हा दाखल करायला लागला नसता, अशी वस्तुस्थिती आहे. दोन्ही बाजू ऐकूण हायकोर्टाने प्रतिवादींना नोटीस बजावली. तरुणीतर्फे ऍड. वासुदेव कापसे, ऍड. प्रेरणा पानतावणे यांनी बाजू मांडली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Petition to dismiss false crime