पंपमालक, कर्मचाऱ्यांचा सामान्यांच्या खिशावर डल्ला

Petrol-Pump
Petrol-Pump

नागपूर - सरकारी निर्देशानुसार पेट्रोल पंपावर सुविधा नसतात. त्यातही पंपमालक आणि पेट्रोल वितरक कर्मचारी वाहनधारकांच्या खिशावर डल्ला मारतात. पेट्रोल पंपावर होणाऱ्या ‘गडबडी’विरुद्ध वाहनधारकांनी आवाज उठविल्यास पंपमालक आणि त्याचे आठ-दहा कर्मचारी लगेच गोळा होऊन अरेरावी करतात, अशी जळजळीत प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर व्यक्‍त केली.

‘सकाळ’ने ‘पेट्रोल पंपावर वाहनधारकांची लूट’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. त्यावर फेसबुक, ट्‌विटर, व्हॉट्‌सॲप या सोशल साईट्‌सवर प्रतिक्रियांचा अक्षरश: पाऊस पडला. पंपमालक आणि कर्मचाऱ्यांवर नेटिझन्सनी आगपाखड केली. पेट्रोल पंपावरील वेंडिंग कर्मचारी वेगवेगळ्या ट्रिक्‍स वापरून पेट्रोलमध्ये ‘कंची’ मारतात, याची कबुली खुद्द एका कर्मचाऱ्याने दिली. ५० टक्‍के वाहनचालक नेहमीच घाईत असतात, हीच बाब हेरून कर्मचारी २०० रुपयांच्या पेट्रोलमध्ये ५० रुपयांची ‘कंची’ मारत असल्याचे स्पष्ट झाले.

कर्मचारी आणि पंपमालकांचे संगनमत असते. वाहनचालकांकडून लुटलेल्या पैशाची सायंकाळी वाटणी होते. वाहनधारकांना कसे लुटावे, यासाठी नवीन कर्मचाऱ्यांना ‘ट्रेनिंग’ दिले जाते. पेट्रोलचे वाढते भाव आणि कर्मचाऱ्यांच्या बदमाशीमुळे सामान्य माणूस लुटला जातो. 
- दीपमाला शर्मा

पेट्रोल टाकण्याचा पाइप पारदर्शक असावा, जेणेकरून पाइपमधून पेट्रोल जात आहे किंवा हवा, हे कळेल. कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातल्यास सर्व कर्मचारी एकाच वेळी घोळका करून शिवीगाळ करतात. कधी कधी मारहाणीपर्यंत मजल जाते. 
- नितीन देशभ्रतार

पंपावर सेट करून पेट्रोल मागितल्यास कर्मचारी मशीन खराब असल्याचा बहाणा सांगतात. बिल मागितल्यास बिलबुक नाही किंवा बिल निघत नसल्याची बतावणी करतात. पेट्रोल चोर कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी.  
- सविता जगताप

महिला वाहनचालक असल्यास वाहनात पेट्रोल टाकताना लक्ष विचलित करण्याचा कर्मचारी प्रयत्न करतात. तसेच ऑइल घेण्याची सक्‍तीही करतात. हा सर्व प्रकार पेट्रोल भरतेवेळीच केला जातो. कर्मचारी वाहनचालकाला लुटण्यासाठी नवनवे फंडे वापरतात. 
- सुनीता शेबे

भांडे प्लॉट ते जगनाडे चौकदरम्यान एका पंपावर कर्मचारी चार नोझल पाइप एकमेकांत गुंतवून ठेवतात. मशीन बंद असल्याचे सांगून एका नोझलने पेट्रोल भरतात तर दुसरा कर्मचारी त्या नोझलची आकडेवारी सेट करून वाहनचालकांना मूर्ख बनवतो. २०० रुपयांचे पेट्रोल भरल्यास १२० रुपयांचेच पेट्रोल वाहनात भरतात.
- सूरज दहीकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com