आरोग्य केंद्रातून फार्मासिस्ट गायब!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

नांद (जि. नागपूर) : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शुक्रवारी फार्मासिस्ट नसल्याने चांगलाच गोंधळ उडाला. रुग्ण व नातेवाइकांच्या औषधासाठी रांगा लागल्या. गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याने दवाखान्यातील एकाने मोर्चा सांभाळल्याने स्थिती नियंत्रणात आली. दवाखान्यात कर्मचाऱ्यांचा वाणवा असल्याने ही स्थिती निर्माण झाली होती.

नांद प्राथमिक आरोग्य केंद्राशी लोणारा, वणी, खोलदोडा, आलेसूर, खरकाडा, खापरी, पांजरापार, बेलापार, झमकोली व इतर गावांतील 100 ते 150 रुग्ण विविध प्रकारच्या रोगांच्या उपचारासाठी सकाळी आठ वाजतापासून आले होते. सकाळी येऊन आपला उपचार करून काही मजूरवर्ग कामाला जाता येईल या हिशेबाने पोहोचला. परंतु, फार्मासिस्ट नसल्याने अनेकांना दवाखान्यातच ताटकळत थांबावे लागले. दवाखान्यात डॉक्‍टर, नर्स उपस्थित होते. एका रुग्णाला वेळेवर औषधी न मिळाल्याने त्याला उलट्याही झाल्या. रुग्णांनी सरपंचांना बोलावून आपबीती सांगितली. यानंतर डॉ. केवल कोरडे यांनी फार्मासिस्टचे काम एका नर्सला दिले. यामुळे रुग्णांना औषधे मिळू शकली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pharmacist disappears from health center!