एटापल्लीत नक्षलविरोधी शांतता रॅली, प्रतीकात्मक पुतळा दहन

मनोहर बोरकर
शुक्रवार, 27 जुलै 2018

एटापल्ली (गडचिरोली) : येथे नक्षल विरोधी शांतता रॅली काढण्यात आली. रॅली दरम्यान जहाल नक्षली जोगन्ना व महेश गोटा यांची प्रतिकात्मक प्रेत यात्रा दरम्यान माओवाद मुर्दाबाद लोकशाही जिंदाबादच्या घोषणा देत माओवादी चळवळीचा धिक्कार करण्यात आला.

दरवर्षी 27 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान माओवादी चळवळीकडून नक्षल चळवळीचा संस्थापक चारु मजुमदार यांचे मृत्यु प्रीत्यर्थ शहिद सप्ताह घोषित करून नक्षल प्रभावी क्षेत्रात बंद पुकारल्या जातो.

याच दरम्यान पोलिसांकडून विविध मिळावे व कार्यक्रम घेऊन नागरिकांमध्ये नक्षल विरोधी जनजागृती केली जाते सदर रॅली उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय पासून निघुन मुख्य बाजार पेठेतून मार्गक्रमण करीत शिवजी चौकात विसर्जित करून जोगन्ना व महेश गोटा या जहाल माओवाद्यांच्या प्रतिकात्मक पुतळयांचे दहन करण्यात आले यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी किरनकुमार सुर्यवंशी, पोलीस निरीक्षक सचिन जगताप, पोलिस उपनिरीक्षक संजय राठोड, महेश पाटील, नवाज शेख तथा पोलिस अधिकारी, कर्मचारी व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

Web Title: piece rally in etapalli