शाळेत शिरलं रानडुक्कर, विद्यार्थ्यांवर केला हल्ला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 मार्च 2019

अकोल्यातील तेल्हारा तालूक्यातील हिवरखेड येथील सरस्वती प्राथमिक विद्या मंदिर शाळेत एक रानडुक्कर घुसले आहे. शिक्षकाच्या समयसुचकतेनं शाळेतील विद्यार्थ्यांचे प्राण वाचलेत.

हिवरखेड (अकोला) : अकोल्यातील तेल्हारा तालूक्यातील हिवरखेड येथील सरस्वती प्राथमिक विद्या मंदिर शाळेत एक रानडुक्कर घुसले आहे. शिक्षकाच्या समयसुचकतेनं शाळेतील विद्यार्थ्यांचे प्राण वाचलेत.

सध्या त्या रानडुक्करला शाळेतील एका खोलीत कैद करण्यात आले आहे. या घटनेची माहिती अकोट वनविभागाला देताच, त्यांनी घटनास्थळ गाठले असून अकोट क्षेत्रातील वनपरीक्षेत्र मंडळ अधिकारी बावणे यांच्या नेतृत्वात रानडुक्करला पकडण्याची मोहीम सुरु आहे.

Web Title: pig haunch caught in school at akola