पिग्मी एजंटचे अतिरिक्त भत्ते बंद

file photo
file photo

नागपूर : सहकारी पतसंस्थांना ठेवी आणून देणाऱ्या पिग्मी एजंटला दिले जाणारे अतिरिक्त भत्ते बंद करण्यात आले आहे. त्याचा फटका संस्थांना बसण्याची शक्‍यता असून बेरोजगारीतही वाढ होणार आहे. अलीकडेच जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेच्या आदेशानुसार एकूण वसुलीवर अडीच टक्‍क्‍यांवर आता एजंटना मोबदला देता येणार नाही.
महाराष्ट्रात सहकारी संस्थांचे जाळे चांगलेच विणले गेले आहेत. प्रामुख्याने दुकानदारांकडून संस्थांचे ठेवीदार आहेत. त्यांच्याकडून रोजच्या कलेक्‍शनसाठी कमिशन तत्त्वावर एजंट नेमल्या जातात. शंभरावर अडीच टक्के त्याला कमिशन दिले जाते. मात्र, इतक्‍या कमी कमिशनवर कोणी काम करायला तयार नसल्याने संस्था आपल्या खर्चातून अतिरिक्त भत्ते देतात. या अतिरिक्त भत्त्यावरच आता रोख लावण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेच्या नियमानुसार या प्रतिनिधींना 2.5 टक्‍के मोबदला देण्याची तरतूद आहे. राज्य सरकारने वाढीव मोबदला रोखण्याचा आदेश काढल्याने एजंटचे निम्मे वेतन कमी होण्याची शक्‍यता आहे. अल्प मोबदल्यावर एजंटनी काम करण्यास नकार दिल्यास अनेक पतसंसस्था मोडीत निघण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. चांगल्या एजंटला कायम ठेवण्यासाठी वेगळा मार्गही पतसंस्थांना शोधावा लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com