डुकरं शहराबाहेर तर मालक कोठडीत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

नागपूर : महापालिकेने आठवडाभरात 124 डुकरं पकडून शहराबाहेर केली. कारवाईत डुक्करमालकांनी पथकातील कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याने चांगलीच खळबळ उडाली. पोलिसांनी 14 जणांना अटक करून कोठडीत रवानगी केली. मनपा व पोलिसांच्या संयुक्त कारवाईमुळे डुक्करमालकांत धडकी भरली आहे.

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी झोनमधील जनसंवाद कार्यक्रमातून शहरातील डुक्‍करांवर कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानंतर कारवाई सुरू केली. परंतु, काही दिवसांमध्येच ती बंद पडली. नव्या जोमाने महापालिकेने सोमवारपासून कारवाईस सुरुवात केली. डुकरं पकडण्यासाठी तमिळनाडूवरून तज्ज्ञांचे पथक आमंत्रित केले. सध्या केवळ पथकातील कर्मचाऱ्यांची राहण्याची व जेवणाची सोय महापालिकेने केली आहे. सोमवारी पहिल्याच दिवशी 40 तर मंगळवारी जरीपटका भागात 20 डुकरं पकडली. मात्र, कारवाईदरम्यान डुक्करमालकांनी कर्मचाऱ्यांवर हल्ला करून जखमी केले. हल्लेखोरांवर कारवाईच्या प्रक्रियेमुळे दोन दिवस कारवाईत खंड पडला. 14 हल्लेखोरांना अटक करून कोठडीत रवानगी करण्यात आली. त्यामुळे महापालिकेचा उत्साह आणखी वाढला व शुक्रवारपासून पुन्हा कारवाईस सुरुवात झाली. शुक्रवारी 22 तर शनिवारी 42 डुकरं पकडण्यात आली. आठवडाभरात 124 डुकरं पकडली. ही डुक्‍करं शहरापासून 200 किमी लांब निर्जनस्थळी सोडण्याची प्रक्रिया करण्यात येत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The pigs are out of town and in the owner's arrested