डुकरांच्या मालकांचा तलवारीसह हल्ल्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जुलै 2019

नागपूर : डुकरे पकडण्याची मोहीम राबविताना महापालिका अधिकाऱ्यांची चांगलीच कसोटी लागत आहे. आजही पांढराबोडी परिसरात डुकरे पकडण्याची मोहीम सुरू असताना काही डुकरांच्या मालकांनी तलवारी काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी त्यापूर्वीच त्यांना पळवून लावले. त्यामुळे आज मोहिमेतील पथकाने 42 डुकरे पकडली.

महापालिकेने सोमवारपासून डुकरे पकडण्याची मोहीम सुरू केली. यासाठी तमिळनाडू येथून डुकरे पकडण्यात पारंगत असलेल्या एजन्सीला काम देण्यात आले. पहिल्याच दिवशी भिवसेनखोरी व गड्डीगोदाम परिसरातून चाळीस डुकरे पकडण्यात आली. मात्र, पथकातील कर्मचाऱ्यांना डुकरांच्या मालकांनी गुल्हेरद्वारे दगड मारण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी जरीपटका भागात कारवाई सुरू असताना 14 जणांच्या जमावाने हल्ला करीत पथकातील 6 जणांना गंभीर जखमी केले. त्यामुळे महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांनी जरीपटका पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली. 14 हल्लेखोरांना अटक करण्यात आली. त्यानंतर कालपासून पुन्हा मोहिमेने वेग घेतला. आज पांढराबोडी तसेच अंबाझरी पोलिस स्टेशनमागील भागात डुकरे पकडण्याची मोहीम राबविण्यात आली. मोहिमेदरम्यान परिसरातील डुकरांचे मालक तलवारी व इतर हत्यारांसह हल्ला करण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, पोलिसांना कळताच त्यांना पळवून लावले. या कारवाईसाठी अंबाझरी पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षकांचे मोठे सहकार्य लाभले. याशिवाय महापालिकेच्या उपद्रव शोध पथकातील 30 निवृत्त जवानही सुरक्षेसाठी होते. आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार यांच्या नेतृत्वात कारवाई करण्यात आली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pigs' owners attempt to attack with a sword