video : कसं शक्‍य आहे? कोंबडीबिना उबविता येणार अंडी... वाचा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 6 December 2019

आजच्या विज्ञानाच्या युगात अशक्‍य वाटणारी बाबही शक्‍य झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्‍यातील बोरी अरब येथील पेट्रोल पंपावर कार्यरत विवेक कामकरे यांनी अंड्यावर कोंबडी न बसविता पिल्ले काढण्याची किमया करून दाखविली आहे. 

दारव्हा (जि. यवतमाळ) : कोंबडी पहिले आली की अंडे पहिले... या प्रश्‍नाचे उत्तर अजूनही कोणी समाधानकारक देऊ शकलेले नाही. त्यामुळे या प्रश्‍नाचे उत्तर नेमके काय, याबाबत अजूनही उत्सुकता कायम आहे. कुणी म्हणतात कोंबडी पहिले आली... म्हणून तर अंडे आले. पण दुसरी बाजू लगेच विचारते की, कोंबडी आल्याशिवाय अंडं तयार होणार कसे... 

असे का घडले? -  दारांवर लागल्या पाट्या; 'जनगणनेत आमचा सहभाग नाही'

कोंबडी आणि अंडे यापैकी पहिले कोण, हा वाद कायम असतानाच अंड्याला शाकाहारी म्हणावे की मांसाहारी, असाही नवीन प्रश्‍न पुढे आला. एकदा तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कोंबडी व अंड्याला शाकाहारीचा दर्जा देऊन टाका, अशी मागणीच थेट राज्यसभेत केली होती. राऊत याच्या प्रश्‍नाने सभागृहालाही आश्‍चर्याचा धक्‍का बसला होता. राऊत यांनी काही उदाहरणे देऊन आपली बाजू पटवून देण्याचा प्रयत्नही केला होता. वरून आयुष मंत्रालयाने या गोष्टीची दखल घेऊन अंडे शाकाहारी आहे की मांसाहारी, याबाबत नक्की धोरण निश्‍चित केले पाहिजे, अशी मागणीही केली होती. 

असे विविध प्रश्‍न अंडे आणि कोंबडी याबाबत उपस्थित होत असताना आता अंडे उबवायला कोंबडी हवीच कशाला, असाही प्रश्‍न कुणाच्याही मनात नक्कीच येऊ शकतो. कारण कोंबडीच्या पिल्लाचा जन्म होण्यासाठी अंड्याला विशेष तापमान हवे असते. पिल्लाची आई असलेली कोंबडी त्या अंड्यावर बसून ते विशिष्ट तापमान निर्माण करते व मग अंड्यातून पिल्लाचा जन्म होतो.

Image may contain: bird and food
मशीनमध्ये जन्मलेले कोंबडीचे पिल्लू 

या पूर्ण नैसर्गिक प्रक्रियेलाच अंडे उबवणे म्हणतात. मात्र, वरील प्रश्‍नाचे उत्तर यवतमाळ जिल्ह्यातील बोरी अरब (ता. दारव्हा) येथील विवेक कामकरे याने शोधले. अंडी उबवण्यासाठी कोंबडीची गरजच नाही, हे ते विवेकचे उत्तर. त्याने तर कोंबडीविना अंडी उबविणारी मशीनच तयार केली आहे. अंड्यावर कोंबडी न बसविता त्यातून पिल्लांना जन्म देणारी ही अत्यल्प खर्चातील मशीन सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय झाली आहे. आजच्या विज्ञानाच्या युगात काहीही अशक्‍य नाही, हेच विवेकने सिद्ध करून दाखवले आहे. 

Image may contain: 1 person, sitting and indoor
मशीनबद्दल माहिती देताना विवेक कामकरे 

 

हेही वाचा - अरे... कुठे नेऊन ठेवला कांदा माझा? 

 

चिकित्सक बुद्धी, चातुर्याचा परिचय

विवेक कामकरे हे यवतमाळ येथील कॉलेज फॉर लीडरशिप ट्रेनिंग येथे कार्यालय अधीक्षक म्हणून कार्यरत होता. काही काळ तेथे काम केल्यानंतर ते मागील दोन वर्षांपासून पेट्रोल पंपावर कार्यरत आहे. विवेक यांनी चिकित्सक बुद्धी आणि चातुर्याचा परिचय देत अत्यल्प खर्चात ही अंड्यावर कोंबडे न बसविता पिल्ले काढण्याची किमया करणारी मशीन तयार केली आहे. 

Image may contain: food
मशीनमध्ये लावलेले साहित्य 

काय आहे मशीनमध्ये?

कोंबडीच्या पिल्लाचा जन्म होण्यासाठी अंड्याला 36 ते 37 अंश सेल्सि. इतके तापमान हवे असते. विवेक यांनी थर्मोकोलच्या पेटीपासून ही मशीन तयार केली आहे. या पेटीत साठ वॅटचा बल्ब लावून त्यातील तापमान वाढवले आहे. तापमान नियंत्रित करण्यासाठी यंत्र बसविले आहे. त्याद्वारे पेटीमधील तापमान 36 ते 37 एवढे ठेवले जाते. याद्वारे कोंबडी अंड्यावर न बसता अंडे उबविले जातात. 

Image may contain: 1 person, eyeglasses
विवेक कामकरे

कमी खर्चात जास्त नफा 
अन्नाचे स्रोत वाढविण्यासाठी संशोधन करीत असताना ही मशीन मी तयार केली आहे. यवतमाळ जिल्हा शेतकरी आत्महत्यांसाठी ओळखला जातो. ही मशीन शेतकऱ्यांसह बेरोजगारांसाठी उत्तम व्यवसायाचे एक प्रभावी साधन ठरू शकते. कमी खर्चात जास्त नफा मिळवून दंणारी ही मशीन शेतीला जोडधंदा म्हणून उत्पन्नात भर टाकू शकते. 
- विवेक कामकरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A pillu will be ready without a chicken