सदरमधील "ठिकाणा' हुक्‍का पार्लरवर छापा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

नागपूर ः सदर पोलिसांच्या अर्थपूर्ण संबंधाने सुरू असलेल्या लिंक रोडवरील एका हुक्‍का पार्लरवर पोलिस उपायुक्‍तांच्या पथकाने छापा घातला. या छाप्यात 10 तरुणांना ताब्यात घेतले असून जवळपास लाख रुपये किमतीचे हुक्‍का साहित्य जप्त केले. ही कारवाई आज गुरुवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हुक्‍का पार्लरला राज्यभरात बंदी आहे. मात्र, शहरात अनेक ठिकाणी चोरून लपून हुक्‍का पार्लर सुरू आहे. अंबाझरी, फुटाळा, सदर, लिंक रोड, बजाजनगर, सीताबर्डी आणि गणेशपेठमधील काही परिसरातील हुक्‍का बार बिनधास्त सुरू आहेत. दोन दिवसांपूर्वी पोलिस उपायुक्‍त विनीता साहू यांना सदर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लिंग रोडवर बार्बी-क्‍यु रेस्ट्रोच्या मागच्या परिसरात "ठिकाणा' या नावाने हुक्‍का पार्लर सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यांनी पथकाला खात्री करण्यास सांगितले. ठिकाणा पार्लरमध्ये दिवसभर तरुण-तरुणी आणि शालेय विद्यार्थिनींची मोठी गर्दी असल्याचे लक्षात आले. त्यामुळे पोलिस उपायुक्‍तांच्या पथकाने आज बुधवारी रात्री नऊ वाजता सापळा रचून छापा घातला. छापा पडताच युवकांनी पळापळ केली. त्यामुळे हुक्‍का पार्लरमध्ये गोंधळ उडाला. पोलिसांनी 10 तरुणांना ताब्यात घेतले. मोठ्या प्रमाणात हुक्‍का फ्लेवर तंबाखू, हुक्‍का पॉट आणि अन्य साहित्य पोलिसांनी जप्त केले. तसेच हुक्‍का पार्लरचा मालक आणि व्यवस्थापकालाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. रात्री उशिरापर्यंत सदर पोलिस कारवाई करीत होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "Places" in this area Print Hookah Parlor