वाडीत अभियंत्याची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

वाडी(जि.नागपूर ): मिहानमधील एका कंपनीत कार्यरत युवा अभियंत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सायंकाळी दत्तवाडीतील गजानन सोसायटीत उघडकीस आली. सौरव जगदीशप्रसाद शर्मा (वय 26) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ हा मिहानमधील एक कंपनीत अभियंता होता. त्याच्या वडिलांचे आंबेडकरनगर येथे ऑटो स्पेअरपार्टचे दुकान आहे. सहा महिन्यांपूर्वीच त्याचे लग्न झाले. काही दिवसांपूर्वी त्याची पत्नी जयपूर येथे माहेरी गेली होती. घरी तो आई लहान भावासोबत होता. त्याचा भाऊ एमबीबीएच्या अभ्यासक्रमाला आहे. शनिवारी सायंकाळी सौरभने आई व भावासोबत नाश्‍ता केला.

वाडी(जि.नागपूर ): मिहानमधील एका कंपनीत कार्यरत युवा अभियंत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सायंकाळी दत्तवाडीतील गजानन सोसायटीत उघडकीस आली. सौरव जगदीशप्रसाद शर्मा (वय 26) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ हा मिहानमधील एक कंपनीत अभियंता होता. त्याच्या वडिलांचे आंबेडकरनगर येथे ऑटो स्पेअरपार्टचे दुकान आहे. सहा महिन्यांपूर्वीच त्याचे लग्न झाले. काही दिवसांपूर्वी त्याची पत्नी जयपूर येथे माहेरी गेली होती. घरी तो आई लहान भावासोबत होता. त्याचा भाऊ एमबीबीएच्या अभ्यासक्रमाला आहे. शनिवारी सायंकाळी सौरभने आई व भावासोबत नाश्‍ता केला. डोके दुखत असल्याचे सांगून तो घराच्या मागील बाजूला असलेल्या त्याच्या खोलीत गेला. यादरम्यान त्याने पंख्याला चादर बांधून गळफास घेतला. काही वेळाने त्याची आई खोलीत गेली असता सौरभ गळफास लावलेला दिसला. आईने हंबरडा फोडला. भाऊ धावला. शेजाऱ्याच्या मदतीने त्याला खासगी हॉस्पिटलमध्ये नेले. डॉक्‍टरांनी तपासून सौरभ याला मृत घोषित केले. सौरभ याच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. याप्रकरणी वाडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Plaintiff's engineer suicide