"ऑरेंज सिटी स्ट्रीट'ची योजना तयार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जून 2018

नागपूर - शहरातील रखडलेल्या ऑरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्पाचा बिल्डिंग प्लॅन तयार असून, याच वर्षी भूमिपूजन पार पडणार असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी सोमवारी सांगितले. याशिवाय कचऱ्यातून वीजनिर्मिती प्रकल्पाचे भूमिपूजनही लवकरच केले जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. 

नागपूर - शहरातील रखडलेल्या ऑरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्पाचा बिल्डिंग प्लॅन तयार असून, याच वर्षी भूमिपूजन पार पडणार असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी सोमवारी सांगितले. याशिवाय कचऱ्यातून वीजनिर्मिती प्रकल्पाचे भूमिपूजनही लवकरच केले जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. 

अर्थसंकल्प सादर केल्यानंतर ते पत्रकारांसोबत बोलत होते. ऑरेंज सिटी स्ट्रीट हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. 38 एकरांतील या प्रकल्पात व्यावसायिक संकुल, निवासी इमारती, परवडणारी घरे, मनोरंजन पार्क, इस्पितळ, हॉटेल्स, शैक्षणिक संकुल प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी अंदाजपत्रकात 50 कोटींची सुरुवातीला तरतूद करण्यात आली. याशिवाय अंदाजपत्रकात उत्तर नागपूरसाठी भरीव कामे असल्याचे त्यांनी सांगितले. यात कमाल चौकात बीओटी तत्त्वावरील बाजार, सिमेंट रस्ते आदींचा समावेश आहे. याशिवाय त्यांनी अंदाजपत्रकातील योजनांचाही ऊहापोह करीत आरोग्य, शिक्षण, क्रीडा, पाणीपुरवठा, गरिबी निर्मूलन, जुन्याच योजनांना मूर्तरूप देण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. 

अंदाजपत्रकातील योजना व तरतूद 
- मैदानांच्या देखभालीसाठी 10 कोटी, दहापेक्षा जास्त नवे मैदान. 
- सिवेज लाइन, ड्रेनेज लाइनसाठी 31.50 कोटी, नाल्याच्या संरक्षक भिंतींसाठी 12 कोटी. 
- जामघाट येथून नागपुरात पाणी आणणार 
- पुतळ्यांची उभारणी 
- शहर वाहतूक व्यवस्था स्मार्ट होणार 
- महापालिकेत पूर्णपणे सौरऊर्जेचा वापर 
- बीओटी तत्त्वावर बाजारांची निर्मिती 
- बेघरांसाठी विश्राम केंद्र 
- नंदग्राम पशुनिवारण केंद्र 
- माता बाल संगोपन, जननी विमा योजना 
- डायलिसिस केंद्र वाढविणार 
- लाडली लक्ष्मी योजना व महिला समुपदेशन केंद्र 
- उद्याने सामाजिक संस्थांना देणार 
- शहरात झाडे लावण्यावर भर 
- मनपा शाळांच्या सुस्थितीसाठी 9.45 कोटी 
- दिव्यांगांना ई-रिक्षासाठी 1 कोटी, तर इतर बाबींसाठी 9 कोटी 
- महिलांसाठी जिजाऊ संशोधन केंद्र 
- सुलभ शौचालयांसाठी 1 कोटी 

Web Title: Planning for Orange City Street