प्लॅस्टिक बंदीने पाकिटात भरभराट

राघवेंद्र टोकेकर
रविवार, 1 जुलै 2018

सुभाषनगर - गोरगरीब व अशिक्षित महिलांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी परिवर्तन जागृती मिशनने सुरू केलेल्या रद्दीपासून पाकिटे तयार करण्याचा व्यवसाय आता ग्लोबल बाजारपेठेच्या उंबरठ्यावर आहे. प्लॅस्टिक बंदीमुळे या व्यवसायाला अचानक बूस्ट मिळाला असून महिलांच्या पाकिटातही यामुळे भर पडणार आहे.  

सुभाषनगर - गोरगरीब व अशिक्षित महिलांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी परिवर्तन जागृती मिशनने सुरू केलेल्या रद्दीपासून पाकिटे तयार करण्याचा व्यवसाय आता ग्लोबल बाजारपेठेच्या उंबरठ्यावर आहे. प्लॅस्टिक बंदीमुळे या व्यवसायाला अचानक बूस्ट मिळाला असून महिलांच्या पाकिटातही यामुळे भर पडणार आहे.  

सुभाषनगरातील कामगार कॉलनीत राहणारे नरेश शेंडे यांनी काही मित्रांना सोबत घेऊन २०१३ साली परिवर्तन जागृती मिशनची स्थापना केली. त्यांनी रद्दी संकलन करण्यास सुरुवात केली. नागरिकांनाही आवाहन केले. ती महिलांना कागदी पाकिटे तयार करण्यासाठी दिली. त्यामुळे मिळाणारे उत्पन्न त्यांनाच दिले. कुठलेही भांडवल आणि यंत्राची गरज नसल्याने तसेच घरबसल्या कामे करता येणार असल्याने महिलांनी त्यांना सहकार्य केले. त्यामुळे किमान तीन हजार रुपयांचे मासिक उत्पन्न या महिला मिळवू लागल्या. आत्तापर्यंत पाकिटांची विक्री केवळ औषध दुकानांमध्येच होत होती. प्लॅस्टिक बंदीने किराणा, कापड दुकानातूनही कागदी पिशव्यांची मागणी होऊ लागली आहे.

यंत्रसाधनांची, जागेची गरज नसल्याचे आम्हाला सुलभ जाते. आम्ही उपक्रम म्हणून या साऱ्यांकडे बघितले. मात्र, आता हे रोजगाराचे साधन झाले आहे.
- जयमाला सरोदे, सदस्या.

गरीब वस्तीतील महिलांना संघटित करून दोन वर्षांपूर्वी बचतगट सुरू केला. बचतगटाच्या कार्याला जागतिक बाजारपेठ मिळत आहे. आम्ही लवकरच यशस्वी होऊ. 
- नरेश शेंडे, संयोजक, परिवर्तन जागृती मिशन

आम्ही दिवसाला हजार पाकीट तयार करण्याचे लक्ष्य ठेवतो. महत्त्वाचे म्हणजे यासाठी घरातले छोटे-मोठे सगळेच मदत करतात. त्यामुळे हे आमच्या आर्थिक उत्पन्नाचे साधन बनले आहे. 
- किरण चंद्राकार, सदस्या.

पाहुण्यांचे येणे-जाणे, घरातील सर्व कामे सांभाळून हे काम करत असल्याने त्याचे कधीच टेन्शन जाणवले नाही.  
- अर्चना खंडाते, सदस्या.

Web Title: Plastic ban Envelope Production women employment