प्लॅस्टिक बंदीबाबत सोशल मीडियावर हास्यकल्लोळ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 जून 2018

नागपूर - ‘नोटाबंदी’नंतर प्लॅस्टिक बंदी लागू होताच सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. शीघ्र कवी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नावावर खपवण्यात आलेली पोस्ट नेटिझन्सच्या चांगलीच पसंतीस पडली असून व्हायरल होत आहे. 

पुणेकरांच्या खास पोस्टही सध्या व्हॅाट्‌सॲपवर चांगल्याच लाइक केल्या जात आहे. त्यात ‘आमच्याकडे प्लॅस्टिक पिशव्यांना कव्हर लाऊन मिळेल’, ‘नोटाबंदीप्रमाणे प्लॅस्टिक पिशव्याही बदलवून मिळेल’, ‘घरासमोर गाडी पार्क केल्यास हॅंडलला कॅरिबॅग अडकवल्या जाईल,’ अशी खास पुणेरी धमकीही यातून दिल्या जात आहे.

‘माकडांच्या हाती दिलं सत्तेच बटन, कॅरिबॅग नाही तर काय, खिशात नेऊ मटण..!,

‘बरं झाल प्लॅस्टिक बरोबर काचेवर बंदी नाही आली ती... नाहीतर दारूच्या दुकानावर तांब्या घेऊन जावं लागलं असतं...’,

‘आधी तांदळाच्या डब्यातल्या नोटा काढायला लावल्या... आता गादीखालच्या पिशव्या...’

‘अरे वेड्या रविवारी कुठे शाळेला निघाला... काका, शाळेत नाही; मटण आणायला शाळेची बॅग घेऊन चाललोय.

Web Title: plastic ban ssocial media ramdas athawale