आयुक्तांनी गोळा केला प्लॅस्टिक कचरा 

नागपूर :  महापालिकेसमोर रस्त्यावरील प्लॅस्टिक कचरा उचलताना आयुक्त अभिजित बांगर; सोबत मनपातील अधिकारी, अग्निशमन अधिकारी व विविध सामाजिक, पर्यावरणप्रेमी संस्थांचे प्रतिनिधी.
नागपूर : महापालिकेसमोर रस्त्यावरील प्लॅस्टिक कचरा उचलताना आयुक्त अभिजित बांगर; सोबत मनपातील अधिकारी, अग्निशमन अधिकारी व विविध सामाजिक, पर्यावरणप्रेमी संस्थांचे प्रतिनिधी.

नागपूर : महापालिकेच्या "प्लॉग रन' मोहिमेअंतर्गत आयुक्त अभिजित बांगर यांच्यासह अधिकारी, विभागप्रमुखांनी पोते घेऊन प्लॅस्टिक कचऱ्याची उचल केली. रस्त्यावर पडलेला प्लॅस्टिकचा कचरा उचलत आयुक्तांनी नागरिकांना प्लॅस्टिक न वापरण्याचे आवाहन केले. आयुक्तांनी घेतलेल्या पुढाकाराने रस्त्यावरील नागरिकही मोहिमेत सहभागी झाले. 
राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त बुधवारी महापालिका, स्मार्ट ऍण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, दहाही झोन कार्यालयाच्या वतीने "प्लॉग रन'चे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी उपस्थितांना प्लॅस्टिकमुक्त नागपूर शहर साकारण्यात आपण सहभागी होऊ या आशयाची शपथ अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली. यानंतर योग शिक्षक मोरेश्‍वर वरघणे आणि योगपटू धनश्री लेकुरवाळे यांनी जीवनात योगाचे महत्त्व सांगत प्रात्यक्षिके करून दाखविली. मनपा आयुक्त अभिजित बांगर यांच्या नेतृत्वात आणि अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्या मार्गदर्शनात मनपापासून "प्लॉग रन'ला सुरुवात झाली. चेहऱ्यावर मास्क, हातात मोजे घालून अधिकाऱ्यांसह विविध सामाजिक, पर्यावरणप्रेमी संघटनांच्या स्वयंसेवकांनी रस्त्यावर पडलेले प्लॅस्टिक जमा केले. मनपा मुख्यालय, विधानभवन चौक, मिठा नीम दर्गा, आकाशवाणी चौक, जिल्हाधिकारी कार्यालय, व्हीसीए ग्राउंड असे मार्गक्रमण करीत "प्लॉग रन' मनपा मुख्यालयात पोहोचली. प्लॅस्टिकमुक्तीच्या घोषणा देत जमा केलेले प्लॅस्टिक पुनर्प्रक्रियेसाठी पाठविण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com