'पीएम मोदी'चा नायक विमानतळावरूनच परतला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 एप्रिल 2019

निवडणूक आयोगाने "पीएम नरेंद्र मोदी' या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती दिल्यामुळे प्रमोशनसाठी बुधवारी नागपुरात आलेला यातील नायक अभिनेता विवेक ओबेरॉय नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आल्या पावली मुंबईला परतला.

नागपूर - निवडणूक आयोगाने "पीएम नरेंद्र मोदी' या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती दिल्यामुळे प्रमोशनसाठी बुधवारी नागपुरात आलेला यातील नायक अभिनेता विवेक ओबेरॉय नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आल्या पावली मुंबईला परतला.

चित्रपटाचे निर्माते संदीप सिंग हेसुद्धा विवेकसोबत होते. चित्रपटाला स्थगिती दिल्यामुळे नागपूरच्या प्रेस क्‍लबमधील पत्रकार परिषद रद्द करण्यात आली. तरीही हे दोघे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना भेटायला येणार होते. महाल येथील संघ मुख्यालयात सरसंघचालकांना चित्रपट दाखविण्याचाही त्यांचा विचार होता, असे कळते. पण, नागपूरमध्ये गुरुवारी (ता. 11) होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सरसंघचालकांनी त्यांना भेट नाकारली. त्यामुळे नागपूर विमानतळावरूनच मुंबईला परतण्याचा निर्णय विवेक ओबेरॉय आणि संदीप सिंह यांनी घेतल्याचे समजते.

Web Title: PM Narendra Modi Movie Actor vivek oberoi Airport