पुलवामातील गुन्हेगाऱ्यांना शिक्षा कधी, कुठे आणि केव्हा हे लष्कर ठरवेल: मोदी

Narendra Modi
Narendra Modi

पांढरकवडा : आपल्या लष्कराबद्दल आपल्याला गर्व आहे. सीआरपीएफमध्ये चीड असून, आम्ही सुरक्षा रक्षकांना सूट दिली आहे. देशाला मी पुन्हा विश्वास देतो की धैर्य ठेवा. पुलवामातील गुन्हेगारांना शिक्षा कधी, कुठे आणि केव्हा देणार हे आपले लष्कर ठरवेल. या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना नमन करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे बचतगटच्या कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी  महाराष्ट्राचे राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आदी उपस्थित होते. नागरिकांना घरांचे वाटप करण्यात आले. पांढरकवड्यात का आला? हे विचाराल तर मी तुमची खुशाली जाणण्यासाठी आलो आहे. नरेंद्र मोदींची भाषणाची गोंडी, कोलामी, बंजारा भाषेतून सुरुवात केली. आपले आशीर्वाद कायम ठेवा. तुमचा माझ्यावरील विश्वास कायम ठेवा, असेही त्यांनी म्हटले आहे.

मोदी म्हणाले, ''पुलवामात जे काही झाले, त्याबद्दल मी तुमचा आक्रोश समजू शकतो. महाराष्ट्रातील दोन जवान हुतात्मा झाले आहे. ज्या परिवाराने आपल्या सुपुत्राला गमाविले आहे, हे दुःख तेच जाणू शकतात. या हुतात्म्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. दहशतवादी संघटनांनी जो गुन्हा केला आहे, त्यांनी कितीही लपण्याचा प्रयत्न केला पण त्यांना शिक्षा दिलीच जाईल.'' 

देशात 2022 पर्यंत प्रत्येकाकडे पक्के घर असेल. महाराष्ट्रात अडीच लाख घरे बनविण्यात आली आहे. महिला सशक्तीकरणाबाबत यवतमाळ देशातील अग्रणी जिल्ह्यांमध्ये आहे, असे मोदी यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com