प्र. ना. परांजपे यांच्या पत्नीचे नागपुरात निधन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 जानेवारी 2019

प्र. ना. परांजपे यांना अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचा प्राचार्य राम शेवाळकर स्मृती भाषाव्रती पुरस्कार प्रदान केला जाणार होता. सायंकाळी ६ वाजता होणारा हा पुरस्कार सोहळाही आता पुढे ढकलण्यात आला आहे.

नागपूर : ज्येष्ठ भाषा अभ्यासक प्र. ना. परांजपे यांच्या पत्नी वसुधा परांजपे (७६) यांचे मंगळवारी (ता.१५) नागपुरात ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.

प्र. ना. परांजपे यांना अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचा प्राचार्य राम शेवाळकर स्मृती भाषाव्रती पुरस्कार प्रदान केला जाणार होता. सायंकाळी ६ वाजता होणारा हा पुरस्कार सोहळाही आता पुढे ढकलण्यात आला आहे. यवतमाळ येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात "साहित्यकेंद्री अभ्यासक्रमांमुळे भाषा शिक्षणाची दुरवस्था" या विषयावरील परिसंवादात प्र.ना. परांजपे अध्यक्ष होते. यवतमाळ येथून १३ जानेवारीलाच दोघेही नागपुरात आले. १४ जानेवारीला त्यांनी नागपूरची सफर केली.

पहाटेपासून त्यांना श्वास घ्यायला त्रास सुरू झाला. सकाळी सहाच्या सुमारास ऍम्बुलन्सने धंतोली (नागपूर) येथील शुअरटेक हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आले. पण, दुर्दैवाने तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. येथील शासकीय रुग्णालयात दुपारी साडेबाराच्या सुमारास शवविच्छेदन झाले. रात्री एअरबसने त्यांचा मृतदेह पुण्याला नेण्यात येईल, अशी माहिती महामंडळातील पदाधिकाऱ्यांनी दिली. 

Web Title: PN Paranjpe wife dead in Nagpur