शेंगा, फुलांसह सोयाबीन पीक करपले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 सप्टेंबर 2019

पुसद (जि. यवतमाळ) : तालुक्‍यातील 35 किलोमीटर अंतरावरील पिंपळगाव (उजाड) येथील शेतकरी दिनेश मुरलीधर राठोड यांच्या तीन एकरातील शेंगा-फुलांनी लगडलेले सोयाबीन पीक अचानक एक आठवड्यात करपले. त्यामुळे शेतकऱ्याला 30 हजार रुपयांचा फटका बसला आहे.
या संदर्भात शेतकरी दिनेश राठोड यांनी पुसद तहसीलदारांना शनिवारी (ता. 7) निवेदन सादर करून नुकसानभरपाईची मागणी केली आहे. तसेच पीक करण्याचे नेमके कारण काय, याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी शेतीला भेट द्यावी तसेच नुकसानभरपाई मिळण्यासाठी कारवाई करावी, असे तालुका कृषी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

शेतकरी राठोड यांनी तीन महिन्यांपूर्वी आपल्या तीन एकर जमिनीत महाबीजच्या सोयाबीन बियाण्यांची लागवड केली. पहिल्या आठवड्यात रासायनिक खते तसेच तणनाशकाची फवारणी केली. आंतर मशागत केल्यानंतर पोषक वातावरणामुळे सोयाबीन पिकाची दीड फुटांपर्यंत जोमदार वाढ झाली. सोयाबीन पीक शेंगा आणि फुलांनी लगडली असताना अचानक एकाच आठवड्यात संपूर्ण पीक एकदम करपून गेले. त्यामुळे शेती उत्पादनाचे राठोड यांचे स्वप्न भंग पावले. या प्रकाराने शेतकरी राठोड चिंताक्रांत झाले. त्यांनी या बाबतीत संबंधित महिला कृषी सहायक यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांना पीक करपण्याच्या संदर्भात योग्य प्रतिसाद मिळाला नसल्याची तक्रार केली.
या शेतकऱ्याच्या आजूबाजूच्या सोयाबीन पीक असलेल्या शेतात पीक करपण्याचा प्रकार आढळून आलेला नाही.

सोयाबीन करपण्याचा प्रकार सार्वत्रिक नाही. पिकावरील औषधी फवारणीमुळे हा प्रकार घडू शकतो. तणनाशकाचा पंप वापरल्यास पीक करपण्याची शक्‍यता आहे. या संदर्भात पीकपाहणी करून कृषी शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात येईल.
- समाधान धुळधुळे,
तालुका कृषी अधिकारी, पुसद.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pods, flower soyabeans with suddenly disappear