कीटकनाशक फवारणीतून दोघांना विषबाधा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जुलै 2018

यवतमाळ - गेल्या वर्षी कीटकनाशकांच्या फवारणीमुळे यवतमाळ जिल्ह्यात 22 शेतकरी व शेतमजुरांचे बळी गेलेत. त्यातून धडा घेत सुरक्षा कीट दिल्याचा व त्याबाबत जनजागृती केल्याचा दावा प्रशासनाने केला.

यवतमाळ - गेल्या वर्षी कीटकनाशकांच्या फवारणीमुळे यवतमाळ जिल्ह्यात 22 शेतकरी व शेतमजुरांचे बळी गेलेत. त्यातून धडा घेत सुरक्षा कीट दिल्याचा व त्याबाबत जनजागृती केल्याचा दावा प्रशासनाने केला.

मात्र, खरीप हंगामाच्या प्रारंभीच दोन शेतकऱ्यांना फवारणी करताना विषबाधा झाली आहे. त्यांच्यावर येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. फवारणीनंतर त्यांना उलटी, हगवणीचा त्रास झाल्याने उपचारासाठी एक जूनला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. विषबाधा संसर्ग म्हणून त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे जिल्हाभरात 20 ते 22 शेतकऱ्यांना आतापर्यंत विषबाधा झाल्याची चर्चा आहे. मात्र, त्याबाबत अधिकृतपणे सांगण्यास कुणीही तयार नाही.

Web Title: Poisoning from both insecticide spraying