विशेष पथकाची वरली मटक्यावर धाड

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जुलै 2018

बोरगाव : बोरगाव मंजू पोलीस ठाणे हद्दीत येणार्‍या शहरासह ग्रामीण भागात वरली मटका सर्रास सुरु असताना याकडे बोरगांव मंजू पोलिसांचे दुर्लक्ष दिसून येत आहे. दरम्यान शनिवारी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने दुपारी काटेपूर्णा येथील वरली मटक्यावर छापा टाकून धटना ठिकाणाहून चार जणांना ताब्यात घेवुन त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ह्यावरुण परिसरात अवैद्य व्यवसाय सुरु असल्याचे सिद्ध झाले हे मात्र निश्चित आहे. दरम्यान बोरगाव मंजू पोलिस दखल घेऊन अवैध धंद्यावर आळा घालतील  काय अशी चर्चा आहे.

बोरगांव मंजू पोलिस ठाणे हद्दीत येणाऱ्या काटेपूर्णा येथे अवैद्य वरली मटका सुरु असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांना मीळाली. त्यावरून त्यांनी आपल्या पथकासह काटेपूर्णा येथील आठवडी बाजारा नजीक सुरु असलेल्या अवैद्य वरली मटक्यावर छापा टाकला असता, घटनास्थळावरुण जगन्नाथ घटे, धन्नु ढोले, ज्योतिबा डोंगरदिवे, प्रेमनाथ गजभिये या चार जणांना मुद्देमाल नगद 2 हजार 850, चार मोबाईल किंमत 4 हजार रूपये, आणि वरली मटका साहित्य असा एकूण सहा हजार आठशे पन्नास रुपयाचा एवज जप्त करुन गुन्हा दाखल केला आहे.

बिट जमादाराचे  दुर्लक्ष
काटेपूर्णा येथे खुले आम आठवडी बाजार परिसरात अवैद्य वरली मटका चालतो, आणि जिल्हा पोलिस अधिक्षक याचे विशेष पथक तेथे छापा टाकून कारवाई करतात. मात्र संमंधित बिट जमादार ह्या अवैद्य व्यवसायाकडे का दुर्लक्ष करतात असा प्रश्न काटेपूर्णा येथील जनतेला पडला आहे.

ठाणेदार मगर लक्ष देतील का?

दरम्यान नव्याने रूजू झालेले ठाणेदार विजय मगर पोलिस स्टेशन हद्दीत सुरु असलेल्या अवैद्य वरली मटका बंद करण्यासाठी पुढाकार घेतील का अशी अपेक्षा जनतेकडून केली जात आहे.

Web Title: police action against gambling four arrested