वणीत क्रिकेट सट्ट्यावर छापा; बिल्डलसह चौघे ताब्यात, एसपींच्या पथकाची कारवाई

Police action on cricket betting in Wani
Police action on cricket betting in Wani

वणी (जि. यवतमाळ) : क्रिकेट सट्ट्यावर छापा टाकून बिल्डरसह चौघांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई रविवारी (ता. दहा) येथील गॅंगशेट्टीचवार मंगलकार्यालय परिसरातील बिल्डरच्या ऑफीसमध्ये करण्यात आली. या कारवाईपासून पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ वणीत ठाण मांडून आहेत.

पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ हे यवतमाळ येथे रुजू होताच त्यांनी अवैध व्यवसायाविरोधात मोर्चा उघडला. जिल्ह्यातील सर्व ठाणेदारांना आपल्या परिसरात असलेले अवैध धंदे बंद करा, असे फर्मान सोडले होते. तरीदेखील छुप्या मार्गाने अवैध व्यवसाय सुरू असल्याचे या कारवाहीमुळे उघड झाले आहे. येथील वरोरा मार्गावर असलेल्या गॅंगशेट्टीवार मंगलकार्यालय परिसरात जम्मू खान या बिल्डरचे कार्यालय आहे.

याच कार्यालयात क्रिकेट सट्टा सुरू असल्याची गोपनीय माहिती अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे यांना मिळाली. त्यांनी आपल्या पथकासह दुपारी पाचच्या सुमारास आमेर बिल्डरच्या कार्यालयावर छापा टाकला.

क्रिकेट सामन्यावर जुगार खेळला जात असल्याचे निदर्शनास आल्याने बिल्डर जम्मू खान याला ताब्यात घेऊन मोमीनपुरा येथील बिल्डरचे घर गाठले. पोलिस वाहनाने वणी गाठल्यास सट्टा खेळणाऱ्या जुगारींना शंका येईल व माहिती लीक होईल, या भीतीने पोलिस पथकाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी चक्क खासगी ट्रॅव्हल्सने वणी शहर गाठले.

पोलिस अधीक्षक ठाण मांडून

पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील व अपर पोलिस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे छापेमारीची कारवाई झाल्यापासून वणीत ठाण मांडून आहेत. त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. शिवाय पोलिस अधिकाऱ्यांना पुढील कारवाईबाबत टिप्स दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com