नांदेड जिल्ह्यात अवैध वाळूसाठ्यावर पोलिसांची कारवाई

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 मार्च 2018

अवैध वाळूसाठ्यावर पोलिसांची कारवाईत 23 टिप्पर, 9 जेसीबी, 8 मोटारसायकली, 18 आरोपींना ताब्यात घेतले आहे. 

उमरी - तालुक्यातील कौडगाव व बिजेगाव येथील रेती घाटावर गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास सहायक पोलिस अधीक्षक नरूल हसन यांनी छापा टाकला. यावेळी अवैध रेती उत्खन करण्याना आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेऊन उमरी पोलीस ठाण्यात  तक्रार  दिली.माञ कारवाई चालु असल्याचे उमरी पोलीसांनी माहिती दिले.
   
यात कौडगाव येथील रेती घाटावरून 23 टिप्पर, 9 जेसीबी, 8 मोटार सायकली व 10 हजार ब्रास रेतीसह 17 आरोपींना ताब्यात घेण्यात आले.यात बिजेगाव येथील रेती घाटावरून एक ट्रॅली व एक आरोपींना ताब्यात घेण्यात आले. एकूण 18 आरोपींना ताब्यात घेण्यात आले. यात उमरी पोलीसात आरोपीच्या विरुद्ध कारवाई करण्याची प्रक्रिया चालू होतीे.
 

Web Title: Police action on illegal sand in Nanded district