मंदीरात जुगार खेळणारे गजाआड

संदीप रायपुरे
सोमवार, 9 जुलै 2018

गोंडपिपरी (चंद्रपूर) - पैसे कमवून दारू पिण्याच्या अभिलाषेपोटी मंदीरात जुगार मांडणाऱ्या तेरा लोकांना रंगेहाथ पकडून कार्यवाही करण्यात आली. धाबा पोलीस स्टेशनचे नवनियूक्त ठाणेदार महेंद्र आंबोरे यांना घटनेची माहिती मिळताच धाड टाकून त्यांनी आरोपींना ताब्यात घेतले. गोंडपिपरी तालुक्यतील गोजोलीत सायंकाळी ही कारवाई झाली. जुगार खेळतांना सरपंचपती सापडल्याने गावासह परिसरात चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत.

गोँडपिपरी तालूक्यातील गोजोली गावातील हनूमान मंदीरात जुगार सूरू असल्याची माहिती धाब्याचे नवनियूक्त ठाणेदार महेंद्र आंबोरे यांना मिळाली. त्यांनी माहितीचा संदर्भ घेत प्रत्यक्ष घटनास्थळी गोपनीयरित्या धाड टाकली. यावेळी गोजोली गावातील हनूमान मंदीरात चक्क पैशाचा जुगार सूरू होता. ठाणेदारांनी धाड टाकल्यानंतर तिथे तेरा लोक पैशाचा जुगार खेळत असतांना पोलीसांनी त्यांना ताब्यात घेतले.

याप्रकरणी सर्व आरोपीविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जुगारात इतर आरोपीहाह गोजोलीतील चक्क सरपंचपती बंडू ठाकरे यालाही पकडण्यात आले.यामुळे या प्रकरणाची जोरात चर्चा रंगविली जात आहे.

ताब्यात असलेल्या आरोपीत श्रीधर आत्राम, अनिल शेःडे,प्रमोद मोहूर्ले, रामदास ठाकरे, नीतेश शेडमाके, राजेश आत्राम, प्रभाकर चौधरी, हनमंतू मोहूर्ले, इंद्रपाल कोवे, अभिषेक ठाकरे, विनोद वसाके, राजू मोहूर्ले या तेरा आरोपींना धाबा पोलीसांनी अटक केली. ही कारवाई ठाणेदार आंबोरे यांच्या मार्गशनात मानिक वागदरकर, अरविंद राठौळ, बाबा नैताम, वशिष्ठ रंगारी नरेश नन्नावरे, अरविंद चूधरी या पोलीस जवांनानी केली. पुढील तपास पोलीस करित आहेत .

Web Title: police arrest 13 people for Gambling