शेतकऱ्याकडून पाच हजारांची लाच घेताना पोलिस अटकेत

file photo
file photo

अमरावती : पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीवर कारवाई करून प्रकरण तहसील कार्यालयात पाठविण्याच्या कामासाठी शेतकऱ्याकडून पाच हजार रुपयांची लाच घेणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (ता. 21) रंगेहात पकडले.
अशोक शंकर पळसपगार (ब. नं. 1106), असे एसीबीने अटक केलेल्या पोलिस हवालदाराचे नाव असून, ते वरुड ठाण्यात कार्यरत आहेत.
वरुड तालुक्‍याच्या वाडेगाव येथील शेतकऱ्याने शेजाऱ्याच्या शेतातून बैलजोडी नेत असताना वाद झाल्याने संबंधितांनी वरुड ठाण्यात तक्रार केली. त्या तक्रारीवरून तत्काळ कारवाई करून प्रकरण वरुड तहसील कार्यालयात पाठविण्याच्या कामासाठी पोलिस हवालदार अशोक पळसपगार यांनी शेतकऱ्याकडे पाच हजार रुपयांची मागणी केली. संबंधित शेतकऱ्याने लाचेची रक्कम देण्यापूर्वी अमरावतीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. त्यानंतर बुधवारी (ता. 21) वरुड तालुक्‍याच्या वाडेगाव येथे तक्रारकर्त्या शेतकऱ्याच्या घरी पोलिस हवालदार हे पैसे घेण्यासाठी गेले. लाचेची रक्कम स्वीकारत असताना हवालदार पळसपगार यास अटक करून त्याच्याविरुद्ध वरुड ठाण्यातच गुन्हा दाखल केला. पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलिस अधीक्षक पी. डी. डोंगरदिवे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक रवींद्र जेधे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com