महाजनादेश यात्रेत निदर्शने करण्यापूर्वीच अतुल लोंढे अटकेत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा शनिवारी सकाळी भंडारा जिल्याकडे निघताना प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यात्रेच्या मार्गात निदर्शने करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा शहरात होती. ही माहिती पोलिसांना मिळताच लोंढेंना त्यांच्या निवासस्थानाहून अटक करण्यात आली. त्यांनी नंदनवन पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले होते. दुपारी एक वाजताच्या सुमारास त्यांची सुटका करण्यात आली.

अटक झाल्याच्या काही तासांतच कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ट्‌वीट करुन या अटकेचा निषेध केला. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आजच्या पत्रकार परीषदेत विचारले असता, "कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलिस त्यांचे काम करीत असतात. मुख्यमंत्री कोणाच्याही अटकेसंदर्भात सूचना देत नाही. पोलिसांनी त्यांचे काम केले.' असे ते म्हणाले.

लोकांची घरे तोडून रस्ते बांधल्या गेले. शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले नाही, बेरोजगारांना रोजगार नाही, मग हा कसला जनादेश? कॉंग्रेस पक्ष याचा निषेध करतो. अशा पद्धतीने अटक करणे हा घटनात्मक हक्काची मुस्कटदाबी आहे. डंपिंग यार्डमुळे लाखो लोकांना दमा झाला. त्याला जबाबदार कोण असा प्रश्न मी विचारला. मुख्यमंत्र्यांच्या दडपशाहीला विरोध करू नये म्हणून मला पहाटे अटक करण्यात आली. इतके घाबरट सरकार कधीही पाहिले नाही. माझ्या अटकेने प्रश्न सुटणार असतील तर मी कायम तुरुंगात रहायला तयार आहे.
- अतुल लोंढे
प्रदेश प्रवक्ता, कॉंग्रेस

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police arrested congress sopkesperson atul londe early morning