लग्नाचे आमिष दाखवून प्रेयसीवर बलात्कार- प्रियकरास अटक 

अनिल कांबळे 
मंगळवार, 22 मे 2018

नागपूर - प्रेयसीला लग्नाचे आमिष दाखवून दोन वर्षांपासून वारंवार बलात्कार केला. मात्र, लग्नाचा तगादा लावला असता नकार दिला. या प्रकरणी नंदनवन पोलिसांनी युवतीच्या तक्रारीवरून प्रियकराविरूद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. 

पीडित 22 वर्षीय तरुणी ही मूळची देवरी (बुटीबोरी) येथील रहिवासी आहे. शिक्षण घेण्यासाठी ती नंदनवनमधील कापसी चौकात राहते. 14 जानेवारी 2016 मध्ये तिची आरोपी राहुल संजय मेश्राम (वय 29, रा. वृंदावन नगर) याच्याशी ओळख झाली. दोघांची मैत्री झाल्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. 

दरम्यान राहुलने तिला लग्न करण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यांच्या प्रेमप्रकरणाची माहिती कुटूंबीयांना मिळाली. मुलीच्या आईवडीलांना लग्न करण्यासाठी दोघांनाही संमती दिली. त्यानंतर त्याने कौटूंबिक कारणे सांगून वारंवार टाळाटाळ केली. त्यानंतर त्याने लग्नास नकार देऊन फसवणूक केली. या प्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल करून राहुल मेश्रामला अटक केली. 

Web Title: police arrested one for rape