नागपूरात वाहनचोर जेरबंद 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 एप्रिल 2019

 पिकअप व्हॅन चोरून नेणाऱ्या चोरट्याला यशोधरानगर पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले. वसीम अहमद ऊर्फ सेबू समसुद्दीन अहमद (30) रा. नूरी मेहमूद मशिदीसमोर, टिपू सुलतान चौक असे या वाहनचोराचे नाव आहे. तो वाहनचोरीत कुख्यात असलेल्या चामा टोळीचा सदस्य असल्याचे सांगण्यात येते. 

नागपूर -  पिकअप व्हॅन चोरून नेणाऱ्या चोरट्याला यशोधरानगर पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले. वसीम अहमद ऊर्फ सेबू समसुद्दीन अहमद (30) रा. नूरी मेहमूद मशिदीसमोर, टिपू सुलतान चौक असे या वाहनचोराचे नाव आहे. तो वाहनचोरीत कुख्यात असलेल्या चामा टोळीचा सदस्य असल्याचे सांगण्यात येते. 

सावनेरजवळील गुजरखेडी येथील रहिवासी गंगाधर पिकअप व्हॅनमध्ये डिटर्जंट पावडर भरून गावोगावी विक्री करतात. 14 एप्रिलला रात्री त्यांनी घरासमोर आपले वाहन उभे केले होते. वसीम अहमदने वाहन चोरून नेले. या प्रकरणी सावनेर पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता. 19 एप्रिल रोजी वसीम अहमद कामठी मार्गावरील ऑटोमोटिव्ह चौकातून चोरीच्या वाहनासह जात होता. त्या वेळी वाहतूक पोलिसांनी नेहमीच्या तपासणीसाठी अडविले. चौकशी करीत असतानाच तो वाहन सोडून घटनास्थळाहून पळून गेला. वाहतूक पोलिसांनी पिकअप व्हॅन यशोधरानगर पोलिस ठाण्यात जमा केले. तपासात ते वाहन सावनेर येथून चोरल्या गेले असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी आरोपीवर लक्ष केंद्रित केले होते. ते वाहन वसीम अहमदच्या घरासमोर उभे असल्याची माहिती खबऱ्याने पोलिसांना दिली. त्याआधारे गुरुवारी पहाटे पोलिसांनी वसीमला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्‍या दाखवताच त्याने वाहनचोरीची कबुली दिली. वसीम चामा टोळीचा सदस्य असल्याचे बोलले जाते. ही टोळी वाहनचोरीत सराईत असून चोरलेल्या वाहनांची मध्य प्रदेशात विक्री करते. 

Web Title: Police arrested Vehicle thief in Nagpur