अम्ब्रिशराव आत्राम यांच्या राजवाड्यात तैनात पोलिसाने केली आत्महत्या

माजी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्या अहेरी येथील राजवाड्यात तैनात पोलिस शिपायाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या
Police at Ambrishrao Atram palace committed suicide Gadchiroli
Police at Ambrishrao Atram palace committed suicide Gadchirolisakal

गडचिरोली : माजी राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्या अहेरी येथील राजवाड्यात तैनात पोलिस शिपायाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना साेमवार (ता. २५) सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. नीतेश अशोक भैसारे (वय ३६) असे मृत शिपायाचे नाव आहे.

नीतेश भैसारे अहेरी येथील प्राणहिता पोलिस मुख्यालयात कार्यरत होता. साेमवारी माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्या निवासस्थानाच्या सुरक्षेसाठी नीतेशची ड्युटी लावण्यात आली होती. ड्युटीवर येताच त्याने आपल्या बंदुकीतून स्वत:वर गोळी झाडली. यात घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. नीतेश भैसारे हा मूळ चंद्रपूर येथील रहिवासी असून, पत्नी, मुलगा व मुलीसह तो अहेरी येथे वास्तव्य करीत होता. त्याच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.

पोलिस घटनेचा तपास करीत असल्याचे पोलिस निरीक्षक श्याम गव्हाणे यांनी सांगितले. विशेष म्हणजे अहेरी येथे राजकीय नेत्यांच्या निवासस्थानी नेमणूक झालेल्या पोलिस शिपायाने आत्महत्या करण्याची ही दोन महिन्यांतील दुसरी घटना आहे. यापूर्वी २० फेब्रुवारीला माजी मंत्री तथा विद्यमान आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या निवासस्थानी तैनात शिपायाने गोळी झाडून आत्महत्या केली होती. साेमवारी माजी मंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्या निवासस्थानी तैनात शिपायाने तेच पाऊल उचलले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com