वाढदिवसाच्या पार्टीत पोलिसांवर हल्ला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

नागपूर : वाढदिवसाच्या पार्टीतील डीजे बंद करण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर काही तरुणांनी दगड व विटांनी हल्ला केला. कोतवाली पोलिसांनी 20 ते 25 जणांविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा नोंदवून नाईक रोड, भोसले वाडा निवासी साहील भोसले (20), हिमांशू भोसले व सिरसपेठ तेलीपुरा निवासी निखिल प्रकाश मडावी (27) यांना अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री साहील भोसलेच्या घरी वाढदिवसाची पार्टी सुरू होती. पार्टीमध्ये डीजेही लावला होता. निर्धारित क्षमतेपेक्षा अधिक आवाजात डीजे वाजत होता. उच्च न्यायालयाच्या दिशा-निर्देशानुसार रात्री 10 वाजतानंतर डीजे वाजवण्यावर प्रतिबंध लावला आहे. यानंतरही रात्री 10.30 ते 11 वाजता दरम्यान अत्याधिक आवाजात डीजे वाजत असल्याने कोणीतरी फोन करून पोलिसांकडे तक्रार केली. तक्रारीवर कोतवाली ठाण्याचे पथक डीजे बंद करण्यासाठी वाढदिवसाच्या पार्टीत पोहोचले. यावेळी काही युवक डीजेच्या तालावर नाचत होते. तर काही नशेत होते. पोलिसांनी डीजे बंद करण्यास सांगितले. यावरून पोलिस आणि पार्टीतील लोकांमध्ये वाद झाला. 20 ते 25 लोक पोलिसांच्या अंगावर मारण्यासाठी धावून आले. पोलिसांशी धक्काबुक्की केली. पोलिस पथकावर विटा आणि दगडफेकही केली. यामुळे तेथे तणाव निर्माण झाला. ठाण्यातून अतिरिक्त पथक बोलावण्यात आले. तगड्या बंदोबस्तात पोलिसांनी डीजे बंद करून जप्त केला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police attack at birthday party