प्रजासत्ताकदिनासाठी तगडा बंदोबस्त

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जानेवारी 2017

नागपूर - प्रजासत्ताक दिनानिमित्त नागपूर शहर पोलिसांनी संपूर्ण शहरभर तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. सर्वच पोलिस उपायुक्‍त आणि पोलिस निरीक्षकांना बंदोबस्ताबाबत सतर्क राहण्याच्या सूचना पोलिस आयुक्‍तांनी दिल्या आहेत. त्यामुळे शहरातील प्रत्येक गजबजलेल्या चौकात पोलिस कर्मचारी तैनात असतील. तसेच शस्त्रधारी जवानांची गस्तही शहरभर असेल.

प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येलाच पोलिस आयुक्‍तांनी बंदोबस्ताचा आढावा घेतला. सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांना फिक्‍स पॉइंट नेमून देण्यात आले आहेत. प्रजासत्ताकदिनाचा आनंद साजरा करताना तरुणाईंनी कोणत्याही प्रकारचा उन्माद करू नये म्हणून गर्दीच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांचे पथक नेमण्यात आले आहे. गर्दी आणि बाजाराच्या ठिकाणी महिला पोलिसांची विशेष नजर राहणार असून अनुचित प्रकारास प्रतिबंध घालण्यासाठी पोलिस सज्ज आहेत. सदर, लकडगंज, अंबाझरी, सीताबर्डी, मोमिनपुरा, मानस चौक, फुटाळा आणि सेमिनरी हिल्स आदी ठिकाणी शस्त्रधारी जवानांची नेमणूक करण्यात आली आहे. यासोबतच संघ मुख्यालय, रेल्वेस्थानक, बसस्थानक, मॉल, मल्टिफ्लेक्‍स सिनेमागृहे, दीक्षाभूमी, टेकडी मंदिर यासह अन्य धार्मिक स्थळीही पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे. अतिशीघ्र कृती दलाच्या जवानांनाही (क्‍यूआरटी) 24 तास अलर्ट ठेवण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना तैनात करण्यात आले आहे. दोनशे पोलिस शस्त्रासह शहरात गस्त घालणार आहेत, अशी माहिती विशेष शाखेनी दिली.

उद्याने आणि स्टंटबाजांवर "वॉच'
पोलिस विभाग रविवारी सकाळपासूनच शहरात बंदोबस्त लावतील. साध्या गणवेशात फुटाळा, अंबाझरी, गांधीसागर व अन्य तलावावर तैनात असतील. यासोबतच उद्याने आणि तलावावर प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून हुल्लडबाजी करणाऱ्या युवकांवर वाहतूक पोलिसांचा वॉच राहील. दुचाकींना तिरंगा झेंडा लावून शहरात वेगात बाईक चालविणे किंवा स्टंटबाजी करण्याऱ्यांवरही पोलिस "ब्रेक' लावतील.

Web Title: police bandobast to republic day