लाच घेताना पोलिस हवालदाराला अटक

रमेश बिसेन
रमेश बिसेन

सालेकसा (जि. गोंदिया) : अदखलपात्र गुन्हा व पंचनाम्याची प्रत देण्यासाठी दीड हजाराची लाच स्वीकारताना पोलिस हवालदाराला अटक करण्यात आली. ही कारवाई सोमवारी (ता. 17) येथील पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. रमेश श्रीराम बिसेन (वय 50), असे लाचखोर पोलिस हवालदाराचे नाव आहे.
यातील तक्रारदाराकडे स्वतःच्या मालकीचे क्वॉलिस चारचाकी वाहन आहे. आवश्‍यकतेनुसार ते वाहन भाड्याने देत असतात. 24 एप्रिल रोजी त्यांनी लग्नाचे वऱ्हाडी नेण्यासाठी वाहन भाड्याने पठाणटोला येथे नेले होते. पठाणटोला येथे काही व्यक्‍तींनी त्यांच्यासोबत भांडण करून वाहनाची तोडफोड केली. या घटनेची तक्रार त्यांनी सालेकसा पोलिसांत दिली. पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. तथापि, तक्रारदारास विम्याच्या क्‍लेमकरिता अदखलपात्र गुन्ह्याची प्रत व घटनास्थळाच्या पंचनाम्याची प्रत आवश्‍यक असल्याने ते पोलिस ठाण्यात गेले. या वेळी पोलिस हवालदार बिसेन याने त्यांना प्रत देण्याकरिता दोन हजार रुपयांची मागणी केली. परंतु, लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे 13 जून रोजी तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पथकाने पडताळणी केली. अखेर सोमवारी पोलिस ठाण्यात सापळा रचला. या वेळी दोन हजार रुपयांपैकी तडजोडीअंती दीड हजार रुपये तक्रारदाराकडून स्वीकारताना पोलिस हवालदार बिसेन याला रंगेहाथ अटक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com