esakal | सावधान ! चंद्रपूरात बनावट कागदपत्रांच्या आधारे ते देतात नोकरीचे नियुक्‍तीपत्र
sakal

बोलून बातमी शोधा

crime

बनावट कागदपत्रांच्या आधारे वेकोलिचे नियुक्तीपत्र देणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या हाती लागली आहे. यातील पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. यातील आणखी काही आरोपी फरार असल्याने अटकेतील आरोपींची ओळख गोपनीय ठेवण्यात आली आहे.

सावधान ! चंद्रपूरात बनावट कागदपत्रांच्या आधारे ते देतात नोकरीचे नियुक्‍तीपत्र

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर : नोकरीची गरज सगळ्यांनाच असते आणि अशा नोकरीच्या शोधात असलेल्या गरजवंतांना गळाला लाऊन आपला दोन नंबरचा व्यवसाय करणारेही अनेक असतात. नोकरीची गरज माणसाला इतके हतबल बनवते की ती व्यक्‍ती सारासार विचार करण्याची शक्‍तीही गमावून बसतो आणि नोकरीचे आमिष दाखवून हजारोंनी गंडा घालणाऱ्यांच्या जाळ्यात अलगद अडकतो.

बनावट कागदपत्रांच्या आधारे वेकोलिचे नियुक्तीपत्र देणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या हाती लागली आहे. यातील पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. यातील आणखी काही आरोपी फरार असल्याने अटकेतील आरोपींची ओळख गोपनीय ठेवण्यात आली आहे. दोन वर्षांपूर्वी वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रातही बनावट कागदपत्रांच्या आधारे नोकरी देण्याचे प्रकरण सीबीआयने उघडकीस आणले होते. तेव्हा 14 जणांना अटक झाली होती.

वेकोलिच्या खाणीत ज्यांच्या जमिनी गेल्या. परंतु ज्यांना अनेक वर्षांपासून नोकरीची प्रतीक्षा आहे. अशा प्रकल्पग्रस्तांचा शोध घेणारी टोळी वेकोलित कार्यरत आहे. त्यांच्याकडून मोठ्या रकमा घेऊन वेकोलित नोकरीवर लावून देण्याचे आमिष दिले जाते.

असेच एक प्रकरण कागद पडताळणीच्या वेळेला समोर आले आणि वेकोलिचे अधिकारी हादरले. वेकोलिचे क्षेत्रीय कार्मिक अधिकारी यांनी रामनगर पोलिस ठाण्यात याची तक्रार केली. तब्बल दहा लोकांनी वेकोलिचे बनावट शिक्के तयार केले. एवढेच नव्हे तर वैद्यकीय प्रमाणपत्रही बोगस तयार केले. त्यांना वेकोलिच्या नोकरीचे नियुक्तीपत्रही देण्यात आले. मात्र, कागदपत्र पडताळणीच्यावेळी हा प्रकार उघडकीस आला.

पोलिसांनी भादंवी 420, 468, 469, 471, 34 अन्वये गुन्हा दाखल केला. यात पाच जणांना अटक करण्यात आली. या प्रकरणातील आणखी काही आरोपी फरार झाले आहेत. त्यामुळे अटकेतील आरोपींची ओळख पोलिसांनी लपवून ठेवली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवून देणारी टोळीच वेकोलित कार्यरत असल्याचा संशय पोलिसांना आहे.

सविस्तर वाचा - हुंडाबळी! सुनेपेक्षा कार झाली मोठी, शारीरिक व मानसिक त्रास अन...

दोन वर्षांपूर्वी वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रात सीबीआयने असेच एक प्रकरण उघडकीस आणले होते. यात बल्लारपूर वेकोलिच्या अधीक्षकांसह 14 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यातही बनावट कागदपत्रांच्या आधारेच नोकरी मिळविली होती. एवढेच नव्हे तर 2011 ते2016 पर्यंत ते वेकोलिच्या वेगवेगळ्या खाणीत कार्यरतसुद्धा होते.

loading image