मुलाच्या अपहरणकर्त्यांना दहा तासात अटक

file photo
file photo

यवतमाळ : तब्बल 50 लाखांच्या खंडणीसाठी व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या सहा संशयितांना अवघ्या दहा तासांमध्ये अटक करण्यात आली. ही कारवाई यवतमाळच्या अवधूतवाडी पोलिसांनी सोमवारी (ता.15) रात्री केली.
शुभम शंकर तोलवाणी (रा. कंवरनगर, सिंधी कॅम्प), नीतेश बापूसिंग राठोड (रा. दाभडी बोरगाव), अरविंद लक्ष्मण साबळे (रा. पिंपळगाव), नीलेश उन्नरकाट (रा. चांदणी चौक), सतीश देवीदास शेलोटकर (रा. गोदाम फैल), सूरज ऊर्फ सपना विश्‍वनाथ शुक्‍ला (रा. बाजोरियानगर, यवतमाळ) असे अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत. किशन नारायण कोटवाणी (रा. कंवरनगर, यवतमाळ) फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
शिकवणीला गेलेल्या हर्ष ईश्‍वर नचवाणी (वय 17) या विद्यार्थ्याचे सोमवारी (ता.15) सकाळी नऊ वाजताच्या सुमारास अपहरण करण्यात आले होते. त्याला शहरालगतच्या इचोरी जंगलात नेऊन त्याच्या वडिलांना फोन केला. शिवाय मुलाचा व्हिडिओ बनवून 50 लाखांच्या खंडणीची मागणी केली होती. ही घटना उघडकीस आल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली. पोलिस पथकांसह नागरिकांनी मुलाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. अपहरणकर्ते रात्रीला शहरात दडून बसल्याची टीप पोलिसांना मिळताच त्यांनी सापळा रचून त्यांना अटक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com