पोलिस हवालदारावर गुन्हा दाखल 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

नागपूर - शारीरिकदृष्ट्या असक्षम असलेल्या महिलेला घरात डांबून चार दिवस उपाशी ठेवल्याने तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिस हवालदार पतीविरुद्ध गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अरविंद लालबच्चन पांडे (वय 54, पोलिस लाइन टाकळी, पथरीगड) असे आरोपीचे नाव आहे. 

नागपूर - शारीरिकदृष्ट्या असक्षम असलेल्या महिलेला घरात डांबून चार दिवस उपाशी ठेवल्याने तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिस हवालदार पतीविरुद्ध गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अरविंद लालबच्चन पांडे (वय 54, पोलिस लाइन टाकळी, पथरीगड) असे आरोपीचे नाव आहे. 

अरविंद पांडे पत्नी सुनीता (वय 50) यांच्यासह पोलिस लाइन टाकळीतील पोलिस क्‍वॉटरमध्ये राहत होते. सुनीता यांची गेल्या सात वर्षांपासून मानसिक स्थिती योग्य नव्हती. मात्र, अरविंद याने तिच्यावर कोणतेही उपचार केले नाही. सुनीता अरविंदची दुसरी पत्नी असून, पहिल्या पत्नीपासून त्याला मुलगा आहे. अरविंद गणेशपेठ पोलिस ठाण्यात हवालदार पदावर कार्यरत आहे. त्याचे नातेवाईक नागपुरात असून, तो पत्नीला सोडून अनेकवेळा तिला न सांगात त्यांच्याकडे राहत होता. पत्नी आजारी असतानाही तो तिला दवाखान्यात नेत नव्हता. तिची मानसिक स्थिती ढासळलेली असताना तिला तो घरात डांबून ठेवत होता. 16 फेब्रुवारीला घरातून दुर्गंधी येत असल्याने शेजाऱ्यांनी गिट्टीखदान पोलिसांना संपर्क साधला. पोलिसांनी घराचे कुलूप तोडले. त्या वेळी सुनीताचा मृतदेह आढळला. मृतदेह कुजण्याच्या स्थितीत होता आणि त्याची दुर्गंधी पसरत होती. अरविंदचा शोध घेतला असता तो बहिणीच्या घरी होता. तो जवळपास सहा दिवसांपासून घरी गेला नव्हता, अशी माहिती त्याने पोलिसांना दिली. पोलिसांनी शवविच्छेदनाच्या अहवालावरून आरोपी हवालदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

सुनीताचा मृत्यू उपासमारीने 
सुनीता यांना गेल्या सहा दिवसांपासून घरात डांबून ठेवण्यात आले होते. मानसिकरीत्या सक्षम नसल्याने त्यांना जेवण बनवता आले नाही. तसेच घरात खायलासुद्धा काही नव्हते. त्यामुळे आजारी असलेल्या सुनीताचा उपासमारीमुळे तडफडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. 

Web Title: Police constable booked up