पोलिस शिपायाची गोळी झाडून आत्महत्या ; कौटुंबिक वादातून कृत्य

A Police Constable suicide due to family Clashes
A Police Constable suicide due to family Clashes

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून पत्नीसोबत सुरू असलेला वाद विकोपास गेल्याने पोलिस दलात शिपाई असलेल्या कर्मचाऱ्याने सर्व्हिस रिव्हॉल्वरने डोक्‍यात गोळी घालून आत्महत्या केली. ही थरारक घटना आज बुधवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास एमआयडीसी परिसरात घडली. विनोद भगवान घिवांदे (वय 29) असे आत्महत्या करणाऱ्या पोलिस शिपायाचे नाव आहे. 

विनोद घिवांदे (बक्‍कल क्र. 386) यांची नियुक्‍ती राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक 13 येथे आहे. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून विनोद यांची तैनाती सेशल प्रोटेक्‍शन युनिट (एसपीयू) येथे होती. ते आईवडील, पत्नीसह जयताळ्यातील रडके ले-आऊट येथे राहत होते. सख्ख्या मामाच्या मुलीसोबत विनोद यांनी लग्न केले होते.

गेल्या काही दिवसांपासून ते तणावात वावरत होते. आज दुपारी दोन वाजता ते आपल्या खोलीत झोपले होते. त्यांनी सर्व्हिस रिव्हाल्वरमधून डोक्‍यात गोळी झाडून आत्महत्या केली. अचानक खोलीतून पिस्तूलातून गोळी सुटल्याचा आवाज आला. त्यामुळे पत्नीने लगबगीने खोलीकडे धाव घेतली. त्यावेळी पती विनोद रक्‍ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यांच्यापाठोपाठ आलेल्या आईने मोठ्याने हंबरडा फोडला. शेजाऱ्यांची एकच गर्दी जमा झाली. एकाने एमआयडीसी पोलिसांनी फोनवरून माहिती दिली. पोलिसांनी लगेच मृतदेह ताब्यात घेतला. उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रूग्णालयात रवाना केला. याप्रकरणी प्राथमिक माहितीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद केली. घटनास्थळाला वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी भेटी देऊन माहिती घेतली. 

कौटुंबिक कलहातून आत्महत्या 

विनोद यांना दारूचे व्यसन होते. त्यामुळे कुटूंबात वाद सुरू होता. मंगळवारी सायंकाळी दारू पिऊन घरी आला. पत्नीने कटकट केल्यामुळे तो बाजुला राहणाऱ्या सासूकडे गेला. तेथे रात्रभर झोपला आणि सकाळी पुन्हा दारू पिऊन घरी गेला. तो पैशाचे पाकीट सासूकडे विसरल्याने पत्नीला आणण्यास सांगितले. मात्र, तिने नकार देत पुन्हा भांडण उकरून काढले. त्यानंतर विनोद यांनी पिस्तुलातून डोक्‍यात गोळी झाडून आत्महत्या केली. 

मित्राला दाखवले पिस्तूल 

आज दुपारी साडेबारा वाजता विनोदचा एक मित्र भेटायला आला. दारूच्या नशेत असलेल्या विनोद यांनी पिस्तूल कसे हाताळायचे? निशाणा कसा साधायचा? याबाबत माहिती सांगत होता. पिस्तूल लोडेड असल्यामुळे पत्नीने पिस्तूल ठेवून देण्यास भाग पाडले. त्यानंतर मित्र निघून गेला. त्यानंतर विनोद यांनी पुन्हा पिस्तूल बाहेर काढले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com