आंबेकरला पोलिस कोठडी

नागपूर : झोपडपट्टीतील डॉन संतोष आंबेकरला बेड्या ठोकून पायी नेताना पोलिस निरीक्षक संतोष खांडेकर आणि पथक. पोलिसांच्या या कृतीमुळे गुन्हेगारी जगताला मोठा हादरा बसला आहे. पोलिसांवर शहरभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
नागपूर : झोपडपट्टीतील डॉन संतोष आंबेकरला बेड्या ठोकून पायी नेताना पोलिस निरीक्षक संतोष खांडेकर आणि पथक. पोलिसांच्या या कृतीमुळे गुन्हेगारी जगताला मोठा हादरा बसला आहे. पोलिसांवर शहरभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

नागपूर :  गुजरातमधील व्यापाऱ्याला बनावट दस्तऐवज दाखवून जमिनीच्या सौद्यात पाच कोटींनी गंडविल्यानंतर एक कोटीची खंडणी मागणाऱ्या डॉन संतोष आंबेकरला गुन्हे शाखेने बेड्या ठोकून पायी न्यायालयात नेले. पोलिसांच्या या कृतीमुळे गुन्हेगारी जगताला मोठा हादरा बसला असून, पोलिसांवर शहरभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. न्यायालयाने त्याला पाच (ता. 18) दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमधील कस्टर ऑइल आणि स्टेनलेस स्टीलचे व्यापारी जिगरभाई पटेल यांना मुंबईत आउटलेट टाकायचे होते. कार्यालय आणि कारखान्यासाठी त्यांना मुंबईत जागा हवी होती. गुजरातमधील खेडा येथे जिगरभाई यांचा कारखाना आहे. आंबेकरने पटेल यांना मुंबईत जागा मिळवून देतो, अशी हमी दिली होती. जून 2018 मध्ये रामदासपेठेतील हॉटेल सेंटर पॉइंटमध्ये त्यांची बैठक झाली. यात पटेल, संतोष आणि नाशिकचा रमेश पाटील, मुंबईचा भय्याभाई आणि नागपूरचा सलीम ऊर्फ राजपूत असे त्याचे पाच साथीदार हजर होते. ठरल्याप्रमाणे पटेल यांनी संतोषला पाच कोटी रुपये दिले होते. मात्र, संतोषने त्यांना जागा मिळवून दिली नव्हती. त्यानंतर पटेल यांनी पैसे परत मागितले असता संतोषने पैसे परत केले नाही. उलट, त्यांना दमदाटी करीत चार कोटींच्या खंडणीची मागणी केली होती. या प्रकरणी सीताबर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष खांडेकर यांनी तातडीने संतोष आंबेकरला अटक केली.
गुंडांची बनावट नावे
आंबेकरने हॉटेलमध्ये बैठकीसाठी नेलेल्या पाच गुंडांची खोटी नावे जिगरभाई पटेल यांना सांगितली होती. त्यामुळे तक्रार अर्जात त्यांनी बनावट नावाने असलेल्या गुंडांची नावे दिली. पोलिसांना आता संतोष आंबेकरचे साथीदार शोधण्यासाठी अडचणीचे जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com