आरोपींना सात दिवस पोलिस कोठडी

ऋषी खोसला
ऋषी खोसला

नागपूर : कूलर व्यापारी ऋषी खोसला हत्याकांडातील चार आरोपींना न्यायालयाने दोन सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. राहुल ऊर्फ बबन राजू कळमकर (32, रा. जिजामातानगर, खरबी), कुणाल ऊर्फ चायना सुरेश हेमणे (21, रा. आझादनगर, बीडगाव), आरिफ इनायत खान (21, रा. खरबी) व अजीज अहमद ऊर्फ पांग्या अनीस अहमद (19, रा. हसनबाग) अशी आरोपींची नावे आहेत. यापूर्वी मुख्य आरोपी मिक्की बक्षी आणि मास्टरमाइंड गिरीश दासरवार यांना अटक केली होती. रविवारी त्यांना न्यायालयाने 28 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन ते तीन वर्षांपूर्वी ऋषी खोसला आणि मधू बक्षी यांच्या अनैतिक संबंधाची माहिती मिक्की बक्षी यास समजली होती. त्यावरून त्यांच्यात नेहमीच खटके उडत होते. त्यामुळे मधूने मिक्कीला घटस्फोट देण्यासाठी कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला होता. मधू ही मिक्कीला दर महिना एक लाखाची खावटी मागत होती. मिक्की 50 हजार रुपये द्यायला तयार होता. परंतु, मधू एक लाखावर अडून होती. त्यामुळे त्यांच्याच नेहमीच वादावादी होत असे. त्यामुळे मिक्कीने मधूला काश्‍मिरी गल्ली (पाचपावली पो. स्टे.) येथील घरी सोडून मुलाला घेऊन राजनगर येथे राहायला गेला होता. मधूच्या कटकटीला त्रस्त झालेल्या मिक्कीने ऋषी आणि मधूचा काटा काढण्याचे ठरविले होते. त्यानुसार आरोपींनी तलवारीने ऋषीचा खून केला. पोलिसांना आरोपींचे कपडे, शस्त्रे आदी साहित्य जप्त करायचे आहेत. या प्रकरणात इतर आरोपींचा सहभाग आहे की नाही, ही बाब तपासण्यासाठी व इतर तपास करण्यासाठी पोलिसांनी दोन सप्टेंबरपर्यंत आरोपींची कोठडी मागितली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com