नोकरीच्या नावाने लुबाडणाऱ्यास 25 पर्यंत पोलिस कोठडी

file photo
file photo

अमरावती : हवाई सुंदरीची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून सहा लाख रुपये लुबाडणाऱ्या साहिल इमरान शेख मेहमूद (वय 34 रा. कृषक कॉलनी, टाकळी, नागपूर) याला जिल्हा न्यायालयाने मंगळवारपर्यंत (ता. 25) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
फ्रेजरपुरा पोलिसांनी बुधवारी (ता. 19) साहिल यास अटक केली. त्याचे दोन साथीदार डॉ. सुनील अंबादास जामोदकर (रा. अमरावती) व शारीक शेख मुश्‍ताक शेख (रा. नागपूर) हे पसार असून, फ्रेजरपुरा पोलिसांचे पथक या दोघांच्या अटकेसाठी नागपुरात गेले. याठिकाणी पोलिस कोठडीतील साहिल याच्या घराची झडती घेऊन काही दस्तऐवज जप्त केल्याची माहिती आहे. परंतु तपास अधिकाऱ्यांकडून त्याला दुजोरा मिळू शकला नाही. याप्रकरणातील दोघांना अटक करण्यासाठी पोलिसांनी येथे अनेकांची चौकशी केली. फ्रेजरपुरा हद्दीत राहणाऱ्या कु. स्नेहा (वय 20) या युवतीला एअर होस्टेस पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले. तिच्या पालकांकडून सहा लाख रुपये या त्रिकुटाने घेतले होते. स्नेहा व्यतिरिक्त अन्य काही युवक, युवतींकडूनही त्यांनी असेच लाखो रुपये उधळल्याची शक्‍यता पोलिस पडताळून बघत आहेत. पैसे घेतल्यानंतर जी बनावट नियुक्तिपत्रे, स्वाक्षरी व शिक्के नेमके कोठून तयार केले. याबाबतची माहिती पोलिसांना मिळू शकली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com