हल्ल्यात पोलिसाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 मे 2018

अमरावती/पळसखेड - गावठी दारू गाळणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर पाच ते सहा जणांनी सशस्त्र हल्ला केला. यात एका पोलिसाचा मृत्यू झाला असून, सहायक पोलिस उपनिरीक्षक गंभीर जखमी झाले. रविवारी (ता. २७) सकाळच्या सुमारास ही घटना घडली.

अमरावती/पळसखेड - गावठी दारू गाळणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर पाच ते सहा जणांनी सशस्त्र हल्ला केला. यात एका पोलिसाचा मृत्यू झाला असून, सहायक पोलिस उपनिरीक्षक गंभीर जखमी झाले. रविवारी (ता. २७) सकाळच्या सुमारास ही घटना घडली.

सतीश मडावी असे मृत पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून श्‍यामराव कवडूजी जाधव (वय ५५, रा. चांदूररेल्वे) हे हल्ल्यात गंभीर जखमी झाले. हल्ल्यानंतर दोन्ही पोलिस कर्मचारी तासभर जखमी अवस्थेत घटनास्थळीच पडून होते. चांदूररेल्वे ठाण्यात कार्यरत एएसआय श्री. जाधव व नाईक सतीश मडावी हे दोघेही मांजरखेड येथील तांडा परिसरात असलेल्या गावठी दारूच्या अड्ड्यावर कारवाईसाठी गेले होते. दारूची एक भट्टी उद्‌ध्वस्त केल्यावर ते दुचाकीने पोलिस ठाण्याकडे परतत होते. त्याचवेळी सावंगा विठोबा ते मांजरखेड मार्गावर पुलाखाली दबा धरून बसलेल्या आरोपींनी त्यांच्या अंगावर गरम पाणी फेकले.

यानंतर मागे बसून असलेले सतीश मडावी यांच्या डोक्‍यावर काठीने प्रहार केला. बचावासाठी ते शेताच्या दिशेने पळाले. मात्र, त्यांना पुन्हा पकडून एक मोठा दगड त्याच्या डोक्‍यात घातला. शिवाय मानेवर कुऱ्हाडीने प्रहार केला. त्यामुळे मडावी यांचा जागीच मृत्यू झाला. आरोपींनी एएसआय जाधव यांच्यावरही काठीने व दगडाने प्रहार केला. दोन्ही गंभीर जखमी पोलिसांना घटनास्थळीच सोडून हल्लेखोर पसार झाले. तासाभराने पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर जखमीला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.

चार आरोपी ताब्यात
पोलिसांवर झालेल्या हल्ल्यात एकाचा खून झाल्यानंतर पोलिसांनी मांजरखेड तांडा परिसरात झडती घेऊन चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केल्याचे अपर पोलिस अधीक्षक श्री. मकानदार यांनी सांगितले.

Web Title: police death by attack