नक्षलवाद्यांच्या भूसुरूंगस्फोटात पोलिसाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 मे 2017

हेमलकसा गावाजवळील घटना; 21 जण जखमी
गडचिरोली - नक्षलविरोधी मोहीम राबवून परत येत असताना नक्षवाद्यांनी केलेल्या भूसुरूंगस्फोटात सुरेश लिंगा तेलामी (27) या पोलिसाचा मृत्यू झाला, तर 21 जण जखमी झाले. ही घटना बुधवारी (ता. 3) सायंकाळी हेमलकसा गावापासून (ता. भामरागड) अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर घडली.

तेलामी हा भामरागड तालुक्‍यातील कृष्णार गावचा रहिवासी आहे. भामरागड तालुक्‍यातील कोठी पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील कोपर्सी व पुलनार जंगलात काल दुपारी नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत टी. गुनिया (सीआरपीएफ), गिरीधर तुलावी व विजयसिंह ठाकूर हे पोलिस किरकोळ जखमी झाले. त्यानंतर अहेरी व भामरागड येथून अतिरिक्त कुमक घटनास्थळी पाठविण्यात आली. दोन भूसुरूंगरोधक वाहनांनी सर्व पोलिस परत येत होते. वाहने हेमलकसा-कारमपल्ली गावादरम्यानच्या रस्त्यावरील नाल्यावर पोचताच नक्षलवाद्यांनी सुरूंगस्फोट घडविला. पहिले वाहन पुढे निघून गेले, तर दुसरे वाहन स्फोटामुळे उंच उडाले आणि तीनदा उलटले. यात सुरेश तेलामी यांचा मृत्यू झाला.

Web Title: police death in geo tunneling blast by naxalite