गर्भपातप्रकरणी डॉक्‍टरसह आरोपींना पोलिस कोठडी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 जुलै 2019

कोदामेंढी (जि. नागपूर : एकवीस वर्षीय मुलीवर अत्याचार करून पाच महिन्यांचा गर्भपात करून त्याला शिवारातील एका नाल्यात जाळल्याची घटना उघडकीस आली. पीडित मुलीच्या तक्रारीवरून अरोली पोलिसांनी आरोपींना अटक करून गुन्हा दाखल केला. गुरुवारी डॉक्‍टरसह सहाही आरोपींना मौदा न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली.
मुख्य आरोपी राहुल जागृत कोडवते, वडील जागृत हिरालाल कोडवते, भाऊ विशाल जागृत कोडवते, आई सुनीता जागृत कोडवते, जावई बाबूलाल पंधरे या पाचही आरोपींना न्यायालयाने सोमवारपर्यंत (ता. आठ) तर गर्भपात करणारा डॉ. राजेश पशिने यास शनिवारपर्यंत (ता. सहा) पोलिस कोठडी सुनावली.

पीडित मुलीचे प्रेमप्रकरण समजताच तिच्या कुटुंबीयांनी तिला नाकारले. त्यामुळे ती राहुलच्या घरी गेली आणि कुटुंबीयांना सर्व हकीकत सांगितली. आधी शरीरसुख नंतर लग्न, असे आमिष मुख्य आरोपी राहुल कोडवते यांनी दिले होते. पाच महिन्यांचा गर्भ असल्याचे माहिती होताच राहुलच्या कुटुंबीयांनी तिला तुमान शिवारातील एका झोपडीत महिनाभर ठेवले. डॉक्‍टरकडून गर्भपाताचे इंजेक्‍शन लावून झोपडीत तिचा गर्भपात केला होता. चार दिवस उपाशी राहिलेल्या ओल्या अंगावर नराधमाने शरीरसुखाची भूक भागवली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police detained accused in abortion case