पोलिसांना सापही ‘सापडेना’

snake
snake

अकोला ः सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात भल्या मोठ्या सापाचे दर्शन होत असल्यामुळे पोलिस कर्मचारी चांगलेच धास्तावले आहेत. मंगळवारी दुपारी पुन्हा नागराजाचे दर्शन झाल्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांनी सर्पमित्र बाळुभाऊ देशमुख यांना पाचारण केले होते. त्यांनी तीन तास सर्च मोहिम राबविली. परंतु, साप दिसून आला नाही.

सोमवारी सायंकाळच्या सुमारास लाल रंगाचा सात-आठ फूटाचा साप कोतवाली पोलिस ठाण्याच्या मागील परिसरात काही पोलीस कर्मचाऱ्यांना दिसून आला. त्यानंतर हा साप स्टेशन डायरीच्या खोलीत सुद्धा गेला असल्याचे कर्मचाऱ्यांनी पाहिले. नंतर हा साप कोतवाली ठाण्याच्या मागील बाजूस असलेल्या शौचालयाजवळ दिसून आला होता. ठाण्यातील मागील जागेत मोठ्या भंगार पडलेले असून, याचठिकाणी शौचालय सुद्धा आहे. त्यामुळे कर्मचारी चांगलेच धास्तावून गेले होते.

मंगळवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास काही पोलिस कर्मचाऱ्यांना पुन्हा साप दिसल्याने, त्यांनी सर्पमित्र बाळुभाऊ देशमुख यांना बोलाविले. त्यांनी ठाण्याच्या मागील जागेत तीन तास सापाचा शोध घेतला. परंतु साप काही दिसून आला नाही. दोन दिवसांपासून सापाचे दर्शन होत असल्यामुळे पोलिस कर्मचारी दहशतीत वावरत आहेत.

पोलिस ठाण्यात अडचणी
सिटी कोतवाली पोलिस ठाण्यांबरोबरच शहरातील खदान, रामदासपेठ, डाबकी रोड, जुने शहर या पोलिस ठाण्यात भंगार वाहनांचा वाढलेला खच, वाढलेले गांजर गवत अाणि खुले मैदान यामुळे या पोलिस ठाण्यांत सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर नाकारता येत नाही. तेव्हा योग्य त्यावेळी या अडचणी दूर करणे गरजेचे अाहे नाही तर अनुचित प्रकाराला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com