पोलिसांनी उधळला नक्षल्यांचा स्फोटाचा कट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जुलै 2019

गडचिरोली : नक्षलविरोधी अभियानावर असताना स्फोटकांद्वारे पोलिसांचा घातपात करण्याचा नक्षल्यांचा कट पोलिसांनी उधळून लावला. चामोर्शी तालुक्‍यातील माडेआमगावजवळ नक्षल्यांनी स्फोटके पेरून ठेवली होती. ती निकामी करण्यात पोलिसांना यश आले. बुधवारी सकाळी रेगडी पोलिस मदत केंद्रात तैनात पोलिस रेगडी ते कोतेपल्ली रस्ता खुला करीत असताना माडेआमगाव फाट्याजवळ असलेल्या पुलाखाली नक्षल्यांनी स्फोटके पेरून ठेवल्याचे दिसून आले. त्यानंतर तातडीने गडचिरोली येथील बॉम्ब शोधक व नाशक पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. या पथकाच्या जवानांनी 10 किलो वजनाची स्फोटके शिताफीने काढून ती निकामी केली. यामुळे मोठा अनर्थ टळला.

गडचिरोली : नक्षलविरोधी अभियानावर असताना स्फोटकांद्वारे पोलिसांचा घातपात करण्याचा नक्षल्यांचा कट पोलिसांनी उधळून लावला. चामोर्शी तालुक्‍यातील माडेआमगावजवळ नक्षल्यांनी स्फोटके पेरून ठेवली होती. ती निकामी करण्यात पोलिसांना यश आले. बुधवारी सकाळी रेगडी पोलिस मदत केंद्रात तैनात पोलिस रेगडी ते कोतेपल्ली रस्ता खुला करीत असताना माडेआमगाव फाट्याजवळ असलेल्या पुलाखाली नक्षल्यांनी स्फोटके पेरून ठेवल्याचे दिसून आले. त्यानंतर तातडीने गडचिरोली येथील बॉम्ब शोधक व नाशक पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. या पथकाच्या जवानांनी 10 किलो वजनाची स्फोटके शिताफीने काढून ती निकामी केली. यामुळे मोठा अनर्थ टळला. 28 जुलैपासून नक्षलवाद्यांचा सप्ताह सुरू होत असल्याने हिंसक कारवाया घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The police erupted off Naxal blast