पोलिसांची परीक्षा झाली सोप्पी

अनिल कांबळे/नीलेश डोये
शुक्रवार, 12 जुलै 2019

नागपूर : पोलिस दलात नोकरी मिळविण्यासाठी तयारी करणाऱ्या युवकांसाठी आनंदाची बातमी आहे. पोलिस शिपायासाठी असलेल्या शारीरिक चाचणीतून लांब उडी आणि पुलअप्सच्या अटी काढून टाकण्यात आल्या आहेत. गुणही 100 वरून 50 करण्यात आले आहे. महिलांसाठी पायी चालण्याची अट शिथिल करण्यात आली आहे.

राज्यातील लोकसंखेच्या प्रमाणात पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या फार कमी आहे. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दर वर्षी दहा हजार पोलिस शिपायांची भरती करण्याची घोषणा विधानसभेत केली होती. मात्र, प्रत्यक्षात ही घोषणा अमलात येत नसल्याचे सांगण्यात येते. सरकारने आता मेगा भरतीची घोषणा केली असून, या अंतर्गत 70 हजार कर्मचाऱ्यांची विविध खात्यांत नियुक्ती होणार असल्याची माहिती आहे. सर्वाधिक भरती पोलिस दलात होण्याची शक्‍यता आहे. कारण सर्वाधिक पदे पोलिस विभागातच रिक्त आहेत. पोलिस शिपाई बनण्यासाठी असलेली परीक्षा सर्वाधिक कठीण आहे. विशेषत: शारीरिक चाचणी फारच अवघड आहे. शारीरिक चाचणीदरम्यान परीक्षार्थींचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. गृहखात्याने या शारीरिक चाचणीच्या अटीत शिथिलता आणली आहे. पूर्वी शारीरिक चाचणी 100 शंभर गुणांची होती. यात धावणेसोबत लांब उडी आणि पुलअप्सचाही समावेश होता. आता फक्त 1600
आणि 100 मीटर धावणे, गोळा फेकच आहे. ही परीक्षा फक्त 50 गुणांची राहील. तर महिलांसाठी पूर्वी 100 मीटर धावणे व 3 किमी पायी चालणे, गोळा फेक आणि पुलअप्स होते. आता फक्त धावणे व गोळा फेकचाच समावेश आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police exzam now simple