पोलिसांच्या कल्याणासाठी सरकार कटिबद्ध

Sudhir-Mungantiwar
Sudhir-Mungantiwar

नागपूर - पोलिस कर्मचाऱ्यांकडून करण्यात येणऱ्या मागण्या रास्त आहेत. पोलिस कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

महाराष्ट्र राज्य पोलिस कार्यालयीन कर्मचारी मध्यवर्ती संघटना व विदर्भ विभागातील पोलिस कार्यालयीन कर्मचाऱ्यांची रविवारी बालसदन येथील सभागृहात आयोजित राज्यस्तरीय अधिवेशनाच्या उद्‌घाटन सोहळ्यात ते बोलत होते. संघटनेचे अध्यक्ष बबन कचरे, कार्यालयीन अधीक्षक उमेश फुंदे, दीपक बुटले, उमेश नायक, विनोद कडू, रवींद्र घाटोळे, अमोल अवधाने आदी उपस्थित होते. 

संघटनेतर्फे पोलिस कर्मचाऱ्यांनाही महसूल व मंत्रालय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी मिळावी, आरोग्य योजनेत लिपिक व वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांचा समावेश करावा, जुनी पेन्शन योजना लागू करा, लिपिकांची रिक्त पदे भरा, निवृत्तीनंतरही नि:शुल्क वैद्यकीय सुविधा मिळावी, अतिरिक्त कामासाठी भत्ता मिळावा, सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळावा आदी मागण्या मांडण्यात आल्या. या मागण्या प्रशासकीय कमिटीसमोर ठेवून योग्य कार्यवाही करण्याची ग्वाही मुनगंटीवर यांनी दिली. प्रास्ताविक बबन कचरे यांनी केले. संचालन विनोद चव्हाण व सुजाता बंडावार यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com