मृत महिला माओवाद्याची ओळख पटली

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 मार्च 2018

गडचिरोली : एटापल्ली तालुक्‍यातील कोटमीनजीकच्या अलेंगा जंगलात रविवारी (ता. 25) पोलिस व नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक महिला माओवादी ठार झाली होती.

तिची ओखळ पटली असून, ती प्लॉटूम 3ची सदस्य होती. अलेंगा जंगलात सी-60 पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला.

पोलिसांनी प्रत्युत्तर देताच नक्षली घनदाट जंगलात पळून गेले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, एका माओवाद्याचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर जिल्हा पोलिस मुख्यालयात आज शरणागत माओवाद्यांकडून मृतदेहाची ओळख पटविण्यात आली. 

Web Title: Police identify woman maoist who died in encounter